Night Club Canva
गोवा

Goa Assagao: गावात नाईट क्लब नकोच; आसगावात विरोध

Goa Night Club: कृती समितीच्या शिष्टमंडळाने सद्यस्थिती व गावातील ग्रामस्थांच्या भावनांची माहिती दिली

गोमन्तक डिजिटल टीम

गावात येऊ घातलेल्या कथित नाईट क्लबच्या प्रश्नावर आसगाव ग्रामस्थांनी आज मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन आपला आक्षेप नोंदविला. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची विनंती केली. त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्यानंतर मुख्यमंत्री सावंत यांनी या समस्येकडे लक्ष देण्याचे तथा गावात एकही नाईट क्लब कार्यरत होणार नाही, असे आश्वासन दिले.

सोमवारी सायंकाळी, आसगाव - बादे नागरिक कृती समितीच्या शिष्टमंडळाने सुरेंद्र गाड यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना गावातील सद्यस्थिती व गावातील प्रस्तावित नाईट क्लबला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांच्या भावनांची माहिती दिली.

सदर नाईट क्लब हा रहिवासी भागात येत असून ग्रामस्थांना गावात कोणताही क्लब नको, असे उपस्थितांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले.आसगाव-बादे नागरिक कृती समितीचे सदस्य सुरेंद्र गाड यांनी मुख्यमंत्र्यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेतली व आमच्या गावात नाईट क्लब स्थापन करण्यास तथा सुरू करण्यास आमचा तीव्र आक्षेप असल्याचे त्यांना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT