Goa Governor Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

गाव हा राज्याचा मुखवटा: श्री पी एस श्रीधरन पिल्लई

'देशाची प्रगती व देश सुपर पॉवर होण्यास मदत होईल'

दैनिक गोमन्तक

हरमल: गोवा आत्मनिर्भर व स्वायत्त होण्यास अनेक उपाय योजना आखल्या आहेत. राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो, मात्र ग्रामीण भागात जाण्याचा उपक्रम हा केवळ संस्कृती व परंपरा ही गावातच दिसते. गाव हा राज्याचा मुखवटा असतो, ते अनुभवण्याचा प्रयत्न आहे. त्यांचे जतन, संवर्धन केल्यास, देशाची प्रगती व देश सुपर पॉवर होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन राज्यपाल श्री पी एस श्रीधरन पिल्लई यांनी केले.

मांद्रे पंचायत समितीने आयोजित, राज्यपाल व पाच पंचायत सरपंचसाहित वार्तालाप कार्यक्रमात राज्यपाल श्री पिल्लई, मांद्रे दिनदयाळ सभागृहात बोलत होते. गोवा देशात महत्त्वाचे राज्य आहे. महात्मा गांधींनी ग्रामस्वराज्य ही संकल्पना मांडली होती.

राज्यपालांनी गावातील सरपंच लोकांशी हितगूज करून विकासास सहकार्य करावे व संस्कृती जाणून घ्यावी हा उद्देश आहे.राज्यपाल दैनंदिन प्रशासकीय अधिकार बाजूला ठेवतो हे विशेष. अनेकदा लोकशाहीत ‘सुप्रीम’कोण हा प्रश्न असतो. मात्र सुप्रिम कोण? राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्री की आमदार, परंतु याचे उत्तर जनता, मतदार आहे व आम्ही लोकांचे सेवक आहोत हे होय. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 71 वाढदिनी, त्यांच्या आवाहनानुसार, ग्रामीण भागात जाण्याचा संकल्प केला होता व तो सुरू ठेवला, असे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले.

व्यासपीठावर मांद्रे मतदारसंघाचे आमदार जित आरोलकर, सचिव मिहीर वर्धन, जिल्हाधिकारी उत्तर गोवा गोपाळ पार्सेकर, उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर, मामलेदार अनंत मळीक, गटविकास अधिकारी मनेश केदार, मांद्रेच्या सरपंच प्रिया कोनाडकर, मोरजीच्या सरपंच वैशाली शेटगावकार,चोपडेचे सरपंच भगीरथ गांवकर, पार्सेच्या सरपंच प्रगती सोपटे, तुयेचे सरपंच सुहास नाईक होते. राज्यपालांनी डायलिसीस रुग्णांना आर्थिक साहाय्य वितरित केले. मांद्रेचे पंच राघोबा गावडे यांनी प्रास्ताविक केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरणार? कमी दाबाच्या पट्ट्यामुळे झालेल्या पावसानंतर पुढील 4 दिवस तुरळक सरींचा अंदाज, शेतकऱ्यांची चिंता कायम

VIDEO: भाजपवर सरदेसाईंचा जोरदार हल्लाबोल; 'वोट चोरी'चा आरोप करत म्हणाले, विधानसभा निवडणूक हलक्यात घेता येणार नाही

8th Pay Commission: 45,000 किमान पेन्शन मिळणार? 8व्या वेतन आयोगासमोर पेन्शनर्सनी मांडल्या ‘या’ मागण्या

West Zone Athletics: पश्चिम विभागीय ॲथलेटिक्ससाठी गोवा सज्ज, यजमानांचा 124 सदस्यीय संघ; स्पर्धा रविवारपासून अटल स्टेडियमवर

Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

SCROLL FOR NEXT