Vasco: एकाच मार्गावर वेगवेगळी वेगमर्यादा, वास्कोतील वाहनचालक चक्रावले; दोन सरकारी खात्यांत समन्वयाचा अभाव

Vasco different speed limits: वास्को येथील राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या निरनिराळ्या वेगमर्यादा फलकांमुळे वाहनचालकांचा पुरता गोंधळ उडत आहे.
Vasco
VascoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

वास्को: येथील राष्ट्रीय महामार्गावर उभारण्यात आलेल्या निरनिराळ्या वेगमर्यादा फलकांमुळे वाहनचालकांचा पुरता गोंधळ उडत आहे.

वाहतूक पोलिस आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामध्ये योग्य समन्वय नसल्याने अशाप्रकारचा गलथान कारभार होत आहे. या दोन विभागांच्या चुकांमुळे वाहनचालकांना नाहक त्रास तसेच भुर्दंड सहन करावा लागत आहे.

या मार्गावर वेगमर्यादाचे नवीन फलक उभारताना जुने वेगमर्यादेचे फलक हटविण्यात न आल्याने नेमकी कोणती वेगमर्यादा पाळावी, यासंबंधी वाहनचालक संभ्रमात असतात. या मार्गावरून वाहतूक पोलिस तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारीही ये-जा करीत असतात. मात्र, या फलकांवरील चुका त्यांना दिसत नसल्याने वाहनचालकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

Vasco
Goa Politics: 'मत चोरी'द्वारे जिंकण्याचा डाव, 1.27 लाख मतदार वगळले; सरदेसाईंचा भाजपवर आरोप

बिर्ला टायटन चौक ते वरुणापुरी यादरम्यानचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पूर्वी १७ (ब) होता. तो क्रमांक आता ५६६ झाला आहे. त्यामुळे वेगमर्यादामध्येही काही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार काही ठिकाणी नवीन वेगमर्यादा फलक उभारले आहेत. नवीन वेगमर्यादा फलक उभारताना जुने वेगमर्यादा फलक

काढण्याची तसदी संबंधित खात्याने घेतलेली नाही. दाबोळी विमानतळासमोरील महामार्गावर ‘वेगमर्यादा ७०’ असा फलक लावण्यात आला आहे. या फलकापासून सुमारे १०० मीटरवर ‘वेगमर्यादा ६०’ असा फलक नजरेस पडतो.

त्यामुळे वाहनचालकांना अचानक वेग कमी करताना कसरत करावी लागते. त्यानंतर या ६० वेगमर्यादा फलकापासून अवघ्या शंभर मीटरवर असलेल्या ग्रेट सेपरेटरच्या (उड्डाण पूल) आरंभी ४० वेगमर्यादेचा फलक उभारण्यात आला आहे.

Vasco
Goa Shack Policy: शॅक्‍स धोरणाला एका हंगामाची मुदतवाढ, नियमभंग केल्‍यास लाखोंचा दंड; सीसीटीव्ही बंधनकारक

तेथून सुमारे १०० मीटरच्या वळणावर ‘वेगमर्यादा २०’ असा फलक नजरेस पडतो. अवघ्या ३०० मीटरच्या अंतरावर चार वेगवेगळ्या वेगमर्यादाचे फलक पाहून वाहनचालक अक्षरश: बुचकळ्यात पडत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com