Biogas  Dainik Gomantak
गोवा

'सिलिंडर'ची चिंता सोडा; 'बायोगॅस'चा वापर करा! सरकारकडून मिळते अनुदान

Biogas as LPG alternative: सध्या देशभरात एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याने नागरिक हैराण आहेत अनेक हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सध्या देशभरात एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्याने नागरिक हैराण आहेत अनेक हॉटेल व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. परंतु यापासून जर आपल्याला मार्ग काढून पुढे जायचे असेल तर स्वस्त आणि मस्त आणि मुख्य म्हणजे पर्यावरणपूरक अशा ‘बायोगॅस’चा पर्याय उपलब्ध असून नागरिकांनी त्याचा वापर करावा असे आवाहन गोव्याचे ‘बायोगॅस अम्बेसिडर’ म्हणून ओळखले जाणारे डिचोलीचे नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर यांनी केले आहे.

नाटेकर म्हणाले, ज्यावेळी आपण बायोगॅस बसवला त्यावेळी मला माझी पत्नी सिलिंडर वापरत असताना बायोगॅसची गरज काय ? असे विचारत असे. परंतु आता मोठा बायोगॅस प्रकल्प उभारला असता तर आम्हाला सिलिंडरची गरजच भासली नसती असे सांगते. पूर्वी वर्षाला १० सिलिंडर लागायचे, परंतु आता केवळ तीन सिलिंडर लागतात, असे ते म्‍हणाले.

वापर कसा करावा?

‘बायोगॅस’मध्ये अंड्यांचे कवच, लिंबू, संत्र्याची साल, कांद्याची साले, चिकनची हाडे इतके सोडल्यास घरातील शिजलेले अतिरिक्त अन्न, भाजीचा कचरा टाकीत टाकावे आणि यातून जो गॅस बनून उर्वरित पाणी आणि इतर गोष्टी बाहेर टाकल्यानंतर त्याचा खत म्हणून वापर करता येतो, असे नाटेकर सांगतात.

लाभ घ्यावा

बायोगॅस बसविण्यासाठी ३० हजारांहून अधिक खर्च येतो, परंतु बायोगॅस बसविण्यासाठी गोवा ऊर्जा विकास संस्था (गेडा) करून आर्थिक सवलत देण्यात येते. कृषी खात्याद्वारे शेतकऱ्यांनी बायोगॅस उभारल्यास ७५ ते ९० टक्के अनुदान (सबसिडी) देण्यात येते. नागरिकांनी यांचा लाभ घेणे नितांत गरजेचे आहे, असेही नाटेकर सांगतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

Goa Infrastructure: डांबरीकरण खोळंबले, बेंजो वाजवून निषेध; मिशन फॉर लोकलतर्फे आंदोलन, आमदार प्रवीण आर्लेकरांवर टीका

SCROLL FOR NEXT