Digambar Kamat Criticized Vijay Sardesai Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'मुख्‍यमंत्री होण्याचं त्‍यांचं स्‍वप्‍नं कधीच पूर्ण होणार'; सरदेसाईं यांच्यावर नाव न घेता कामतांचा जोरदार हल्लाबोल

Digambar Kamat Criticized Vijay Sardesai: ‘काहीजण मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. मात्र, त्यांची स्‍थिती ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’प्रमाणे आहे. त्‍यांची स्‍वप्‍ने कधीही पूर्ण होणार नाहीत, असे आमदार दिगंबर कामत म्हणाले.

Manish Jadhav

‘काहीजण मुख्यमंत्री बनण्याची स्वप्ने पाहू लागले आहेत. मात्र, त्यांची स्‍थिती ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’प्रमाणे आहे. त्‍यांची स्‍वप्‍ने कधीही पूर्ण होणार नाहीत, असे आमदार दिगंबर कामत म्हणाले.

'कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे. भाजपला विजयापासून कोणी रोखू शकणार नाही’, अशा शब्‍दात मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांच्यावर नामोल्‍लेख टाळून जोरदार निशाणा साधला.

दरम्यान, मडगाव येथे मंगळवारी भाजपतर्फे आयोजित करण्‍यात आलेल्‍या मतदार अभिवादन कार्यक्रमात कामत बोलत होते. या कार्यक्रमात 50 हून अधिक मतदारांचा सत्कार करण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार निलेश काब्राल, उल्हास तुयेकर, संकल्प आमोणकर, दाजी साळकर, प्रदेश सरचिटणीस नरेंद्र सावईकर, दामोदर नाईक, सर्वानंद भगत, तुळशीदास नाईक आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी भाजप नेत्‍यांनी जोशपूर्ण भाषणे केली.

सावंतांवर स्‍तुतिसुमने

कामत पुढे म्‍हणाले की, डॉ. प्रमोद सावंत पुन्‍हा मुख्‍यमंत्री होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गोव्‍यावर बारीक लक्ष आहे. 2027 मध्‍ये डॉ. सावंत यांच्‍याच नेतृत्वाखाली गोव्‍यात निवडणुका होतील.

'संविधानाला धोका नाही'

भाजपची (BJP) घोडदौड सुरु आहे. विरोधकांनी संविधान बदलाच्या कहाण्या रचल्या; परंतु जोपर्यंत सूर्य-चंद्र आहेत, तोपर्यंत भाजप संविधान बदलणार नाही, हे मतदारांनी लक्षात ठेवावे. खरे तर, काँग्रेसनेच आठवेळा संविधानात बदल केला. विकास हा निवडणुकीत मुद्दा होऊ शकत नाही, हे आम्‍ही लोकसभा निवडणुकीतून शिकलो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT