Vijay sardesai  Dainik Gomantak
गोवा

Goa News: भोमा, खोर्ली येथील घरे, मंदिरे वाचविण्यासाठी बगलमार्ग वापरा

भोमा आणि खोर्ली येथील रस्त्यासाठी लोकांची घरे आणि गावातील मंदिरे पाडण्याऐवजी बगलमार्गाचा पर्याय वापरा अशी मागणी करणारे पत्र विजय सरदेसाई यांनी गोव्याच्या मुख्य सचिवांना पाठविले.

दैनिक गोमन्तक

Goa News: भोमा आणि खोर्ली येथील ‘राष्ट्रीय हमारस्ता 4-अ’चा विस्तार करून लोकांची घरे आणि गावातील मंदिरे पाडण्याऐवजी बगलमार्गाचा पर्याय वापरा अशी मागणी करणारे पत्र गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी गोव्याचे मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल यांना पाठविले आहे.

गावात विकास करताना स्थानिकांना विश्वासात घेऊन करायचा असतो. तो त्यांच्यावर थोपवायचा नसतो. लोकांनी सरकारला बगलमार्गाचा पर्याय सुचविला आहे. हा पर्याय कमी खर्चिक आहे. तरीही सरकार आपल्याच म्हणण्यावर का अडून बसले आहे ते कळत नाही, असे सरदेसाई यांनी म्हटले आहे.

सदर रस्ता विस्ताराला यापूर्वी स्थानिकांनी विरोध केला होता. त्यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांची भेटही घेतली होती. मात्र त्यांचे म्हणणे मान्य करण्यास त्यांनी नकार दिला होता. सरदेसाई यांनी विधानसभेतही हा प्रश्र्न चर्चेस आणला होता.

मडकई, ओल्ड गोवा, कुंडई या गावांतील असाच प्रश्र्न बगलमार्गाचा पर्याय अवलंबून यापूर्वी सोडविला आहे. मग तेथेच तो पर्याय का स्वीरकला जात नाही? यात कुणाचे हितसंबंध तर गुंतलेले नाहीत ना? असे सवाल त्यांनी उपस्‍थित केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Weekly Horoscope: डबल राजयोग! 'या' 5 राशींचे बदलणार भाग्य; हा आठवडा ठरणार खास, कसा ते वाचा..

Vishwanath Dalvi: दळवींचे बंड शमल्यात जमा! पक्षातील एकीला दिले प्राधान्य; दामू नाईक यांनी काढली समजूत

Zomato platform fee hike: खवय्यांच्या खिशाला कात्री! झोमॅटोकडून प्लॅटफॉर्म फीमध्ये मोठी वाढ

VIDEO: 'वेलकम होम संजू सॅमसन'! चेन्नई सुपर किंग्जने शेअर केला खास व्हिडीओ, फॅन्स झाले इमोशनल

IPL 2026: चेन्नईची 'यलो आर्मी' संकटात! एकापाठोपाठ एक 'मॅचविनर' खेळाडू जखमी; 'कमबॅक'ची आशा धुळीस मिळणार?

SCROLL FOR NEXT