Mahadayi Water Issue: म्‍हादईप्रकरणी भाजपच्‍या नाटकाला बळी पडू नका

‘म्हादई बचाव’ चळवळीची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तयार करण्‍यात आलेल्‍या भाजपच्या ‘चांगल्या कथा असलेल्या नाटकाला‘ बळी पडू नये, असा इशारा काँग्रेसचे गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.
 Mahadayi River | Mahadayi Water Dispute
Mahadayi River | Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute: ‘म्हादई बचाव’ चळवळीची दिशाभूल करण्याच्या उद्देशाने तयार करण्‍यात आलेल्‍या भाजपच्या ‘चांगल्या कथा असलेल्या नाटकाला‘ बळी पडू नये, असा इशारा काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी दिला आहे.

चोडणकरांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तेथील मतदारांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या खुलाशावर गोव्याच्या दोन भाजप मंत्र्यांनी केलेली वक्तव्‍ये गैरसमज पसरविणारी आहेत.

शहा यांच्या विधानावर आक्षेप घेत सुभाष शिरोडकर आणि नीलेश काब्राल हे दोन मंत्री शहा यांना दिल्लीत भेटलेल्या शिष्टमंडळाचा संदर्भ देऊन मुद्दा वळविण्याचा प्रयत्न करत आहेत.

शहा यांनी केंद्रातील, कर्नाटक आणि गोव्यातील भाजप सरकारांनी मान्य केलेल्या गुप्त कराराचा उल्लेख केला होता. गोवा आणि कर्नाटक यांच्यातील म्हादई वळविण्याचा दीर्घकाळ प्रलंबित असलेला वाद भाजपने गोव्यातील भाजप सरकारला सोबत घेऊन सोडवला आहे.

केंद्रातील भाजप सरकारच्या पुढाकाराने दिल्लीत हा कट रचला गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

 Mahadayi River | Mahadayi Water Dispute
Mahadayi Water Dispute: आता लोकांनी पेटून उठण्याची वेळ आली

भाजप नेत्यांमध्ये तेव्‍हा काय घडलं?

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे म्हादई विकण्याच्या कटाचा एक भाग आहेत. डीपीआर मंजूर झाल्यानंतर केंद्रीय मंत्री शहा यांनी गोव्याच्या शिष्टमंडळाशी डीपीआर मंजुरीबाबत चर्चा कुठे केली?

डीपीआर मंजुरीनंतर दिल्लीला गेलेल्या शिष्टमंडळाचा भाग असलेले मंत्री या विषयावर स्पष्टीकरण का देत आहेत? असाही सवाल त्यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रीय राजधानीत पंतप्रधानांची भेट घेतली तेव्हा तीन राज्यांच्या भाजप नेत्यांमध्ये काय घडले याचा खुलासा करणे आवश्‍यक आहे, असे चोडणकरांनी नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com