E-carts

 

Dainik Gomantak 

गोवा

विजय सरदेसाईंनी फातोर्डामध्ये सुरु केले 'ई-कार्ट'

गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी रविवारी फातोर्ड्यात ई-कार्ट्स (E-carts) सुरु केले आहे.

दैनिक गोमन्तक

मडगाव : गोवा फॉरवर्डचे (Goa Forward) अध्यक्ष आणि फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई (Vijay Sardesai) यांनी रविवारी फातोर्ड्यात ई-कार्ट्स (E-carts) सुरु केले असून ‘फातोर्डा मॉडेल’ सर्वांना पुढे घेऊन जाईल, असे सांगितले. ‘व्ही फॉर फातोर्डा’ (V for Fatorda) व उन्नती यांच्या सहकार्याने फातोर्डा येथे महिलांना सक्षम करण्यासाठी ई-कार्ट सुरू केले आहेत. यावेळी नगराध्यक्ष लिंडन परेरा, उषा सरदेसाई, गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्षा आस्मा बी, तियात्रिस्त प्रिन्स जेकब, निमिषा फालेरो आदी उपस्थित होते. आपला परिसर स्वच्छ ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे सरदेसाई म्हणाले. "आम्ही आमचे क्षेत्र स्वच्छ ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे." असे ते म्हणाले.

ते म्हणाले की, ई-कार्टच्या संकल्पनेमुळे महिला सक्षम होती व त्या स्वावलंबी होतील. 1500 रुपयांची गृह आधार मदत कुटुंबाची काळजी घेवू शकत नाही. आपण अशा योजनांवर अवलंबून न राहता स्वावलंबी होण्यावर भर दिला पाहिजे.” असे सरदेसाई म्हणाले. महिलांना पुढे काढण्यासाठी ई-कार्टच्या या संकल्पनेवर सुमारे 30 लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ‘‘ही संकल्पना इथे यशस्वी झाल्यावर आम्ही पुढे नेण्याचा निर्णय घेऊ. या संकल्पनेतून बचत गटांना उपजीविका मिळवून देण्याची संधी मिळेल.” असे ते म्हणाले.

“हा आमच्या फातोर्डा मॉडेलचा विस्तार आहे. आम्ही ते आणखी वाढवू.” असे ते म्हणाले. आस्मा बी म्हणाल्या की गोवा फॉरवर्डचा महिलांना सक्षम बनवण्याचा मानस आहे आणि म्हणूनच हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

प्रिन्स जेकब म्हणाले की, प्रत्येकाने काम करून आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी योगदान देणे गरजेचे आहे. “विजय सरदेसाई यांनी तियात्र सुरू करण्यासाठी त्रियात्र क्षेत्राला मदत केली आहे, मात्र रवींद्र भवन नाट्यगृह उपलब्ध करून न देता अडथळे निर्माण करत आहे. थिएटर उपलब्ध करून दिले नाहीत तर आम्ही तियात्र कसे आयोजित करू.’’ असा प्रश्न त्यांनी केला. आमची रोजीरोटी हिरावून घेणाऱ्या या सरकारला धडा शिकवायला हवा.’’ असे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: मोठा परतावा देण्याचं आमिष दाखवून 1.52 कोटींचा गंडा, सायबर फसवणूक प्रकरणी मुंबईतून एकाला अटक; गोवा पोलिसांची कारवाई!

IND vs WI 2nd Test: 38 वर्षांपासून एकही पराभव नाही, 'दिल्ली'चं मैदान टीम इंडियासाठी लकी; जाणून घ्या काय सांगते आकडेवारी?

Goa Crime: ग्रील कापून घरात घुसले, दाम्पत्याला बांधून ठेवलं, 50 लाखांचा ऐवज केला लंपास; म्हापशात बुरखाधारी दरोडेखोरांची दहशत

Nobel Prize Physics 2025: भौतिकशास्त्राचे नोबेल जाहीर! क्वांटम मेकॅनिकल टनलिंगच्या शोधासाठी तीन शास्त्रज्ञांचा गौरव

Horoscope: उद्याचा दिवस खास! 8 ऑक्टोबर रोजी शुभ धन योगामुळे 5 राशींचे भाग्य उजळणार, गणेशाचा असेल विशेष आशीर्वाद

SCROLL FOR NEXT