Goa: जायंट्स ग्रुप ऑफ वास्कोच्या सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबीर

सहा ठिकाणी मोफत मोफत नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
मंत्री मिलिंद नाईक व जायंटस ग्रुप पास्को यांच्या सहकार्याने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना नगराध्यक्ष दामोदर कासकर सोबत शशिकांत परब व इतर.

मंत्री मिलिंद नाईक व जायंटस ग्रुप पास्को यांच्या सहकार्याने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना नगराध्यक्ष दामोदर कासकर सोबत शशिकांत परब व इतर.

Dainik Gomantak

Published on
Updated on

वास्को: मुरगावचे आमदार तथा मंत्री मिलिंद नाईक यांनी जायंट्स ग्रुप ऑफ वास्कोच्या (Vasco) सहकार्याने मोफत नेत्र तपासणी शिबीर नुकतेच हेडलँड सडा येथील श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात 3237 जणांनी आपले नेत्र तपासून घेतले तर 2887 जणांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

उद्घाटन प्रसंगी बोलताना दामोदर कासकर (Damodar Kaskar) यांनी शरीराचा एक महत्त्वाचा अवयव म्हणजे डोळे असून त्याची निगा राखणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अशा शिबिरांचा फायदा लोकांनी उठवून आपल्या डोळ्यांची तपासणी करून घ्यावी असे त्यांनी आवाहन यावेळी केले.

एकूण सहा ठिकाणी मोफत नेत्र चिकित्सा (Free eye therapy) शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटन श्री लक्ष्मीनारायण मंदिराच्या (temple) सभागृहातून झाली. याठिकाणी प्रभाग एक, दोन, तीन, चार मधील 299 पुरुष व 379 महिला मिळून 678 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. पैकी 558 जणांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. हाउसिंग बोर्ड कॉलनी प्रभाग 7,8 मधील पुरुष 192,222 महिला मिळून 414 नागरिकांनी लाभ घेतला. पैकी 351 जणांना चष्मा देण्यात आला. मंत्र्यांच्या निवासी बंगल्यावर प्रभाग 5,6 मधील 342 पुरुष 438 महिला मिळून 780 जणांनी लाभ घेतला. पैकी 673 जणांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

<div class="paragraphs"><p>मंत्री मिलिंद नाईक व जायंटस ग्रुप पास्को यांच्या सहकार्याने आयोजित मोफत नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करताना नगराध्यक्ष दामोदर कासकर सोबत शशिकांत परब व इतर.</p></div>
Goa: 'सरकारी भरती प्रक्रियेतील घोटाळ्याची तात्काळ सीबीआय चौकशी करा'

बायणा येथे लिओ रॉड्रिगीस यांच्या ऑफिसमध्ये प्रभाग 8 व 9 मध्ये 196 पुरुष व 302 महिला मिळून 498 नागरिकांनी या शिबीराचा भाग घेतला. पैकी 424 जणांना चष्म्यांचे वाटप केले. लक्ष्मीनारायण मंदिर हेडलँड सडा प्रभाग 1,2,3,4 मधील 280 पुरुष व 381 महिला मिळून 661 जणांनी लाभ घेतला. पैकी 604 जणांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. तसेच परत प्रभाग 1,2,3,4 मधील 96 पुरुष व 110 महिला मिळून 206 जणांनी लाभ घेतला. पैकी 177 जणांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

एकूण मुरगाव मतदार संघातील प्रभाग क्रमांक 1 ते 9 मधून 1405 पुरुष व 1832 महिला मिळून 3237 जणांनी या मोफत नेत्रचिकित्सा शिबिराचा लाभ घेतला. पैकी 2887 जणांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले. लक्ष्मी नारायण देवस्थान सभाग्रहात एकूण तीन टप्प्यात तीन दिवस सदर शिबिर घेण्यात आले. या 1,2,3,4 प्रभाग मधून 657 पुरुष व 870 महिलांनी मिळून 1545 नागरिकांनी या शिबीराचा लाभ उठवला तर 1439 जणांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

शिबिराचे उद्घाटन मुरगाव नगरपालिका (Municipality) नगराध्यक्ष दामोदर कासकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंडळ सदस्य शशिकांत परब, नगरसेविका श्रीमती मंजुषा पिळणकर, दामोदर नाईक, विजय केरकर, रमिला आरोलकर, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश बांदेकर, जायंटस अध्यक्ष महादेव मुळगावकर, परशुराम गणाचारी, प्रदीप बांदेकर, राजेंद्र केरकर, आपा नाईक, रामा निरवडेकर, दिपक शेट्ये, माजी नगरसेवक कृष्णा तोरस्कर व इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com