Vijay Sardesai voter list protest Dainik Gomantak
गोवा

4500 मतदारांची नावे वगळल्याचा निषेध, विधानसभेत आवाज उठविण्याचा विजय सरदेसाई यांचा इशारा

Vijay Sardesai voter list protest: गोवा फॉरवर्ड पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, गोव्याशी निष्ठा असलेल्या अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला आहे, असा दावा पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: गोवा फॉरवर्ड पक्षाच्या सदस्यत्व मोहिमेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, गोव्याशी निष्ठा असलेल्या अनेक नेत्यांनी पक्षात प्रवेश केला आहे, असा दावा पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केला. मात्र, ‘एसआयआर’ प्रक्रियेअंतर्गत मतदार यादीतून सुमारे ४,५०० मतदारांची नावे वगळण्यात आल्याच्या घटनेचा त्यांनी तीव्र शब्दांत निषेध केला.

ही बाब गंभीर असून, विरोधी पक्षांनी केलेल्या सामूहिक मतदार नाववगळणीच्या आरोपांना यामुळे बळ मिळाले आहे. याचा गोव्यातील निवडणूक निकालांवर परिणाम होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या अन्यायाविरोधात आपला पक्ष शांत बसणार नाही. या प्रकरणाविरोधात आपण विधानसभेत आवाज उठवणार असल्याचा इशाराही विजय सरदेसाई यांनी दिला.

दिशाभूल करणाऱ्यांपासून सावध राहा!

सरदेसाई म्हणाले, ‘प्रत्येक स्वाभिमानी गोमंतकीयाला गोव्याच्या प्रगतीसाठी प्रादेशिक पक्षाची गरज आहे. एका प्रादेशिक पक्षामुळे झालेल्या गोंधळामुळे लोकांनी इतर पक्षांवरील विश्वास गमावू नये. प्रादेशिकतेचा खरा अर्थ स्थानिक हितासाठी आवाज उठवणे हाच आहे आणि गोव्याच्या भविष्यासाठी हाच एकमेव मार्ग आहे.’ लोकांना दिशाभूल करणाऱ्या शक्तींपासून सावध राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: "मनीषाशीच लग्न लावा, नाहीतर जीव देईन"; तरुणी चढली मोबाईलच्या टॉवरवर, समलैंगिक प्रेमप्रकरणाचा हायव्होल्टेज ड्रामा

Crime News: आईवर डोळा, मुलगा ठरला अडथळा; आठ वेळा जमिनीवर आपटून दीड वर्षांच्या चिमुकल्याची हत्या, आरोपीला फाशीची शिक्षा

Rajpal Yadav Jail: राजपाल यादवच्या अडचणीत वाढ! चेक बाऊन्स प्रकरणात हाय कोर्टाचा दणका, 3 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा

Goa Crime: सिकेरीत रिसॉर्टजवळ सापडला शाहिद आफ्रिदीचा मृतदेह, कांदोळी समुद्रकिनाऱ्यावरून झाला बेपत्ता

Sheikh Hasina: "माझी हत्या होऊ शकते, पण तरीही मी...," शेख हसीना बांगलादेशला परतणार; कोर्टाने ठोठावली फाशीची शिक्षा

SCROLL FOR NEXT