Vijai Sardesai Slams goa government Dainik Gomantak
गोवा

Mhadai River बाबत कर्नाटककडून अवमान; तरी ही मुख्यमंत्र्यांचे मौन बधिर करणारे: विजय सरदेसाई

म्हादईवरुन विजय सरदेसाई यांची राज्य सरकारवर सोडले टीकास्त्र

Sumit Tambekar

म्हादई प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्याच्या कर्नाटकच्या योजनेवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे मौन बधिर करणारे असल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे प्रमुख विजय सरदेसाई यांनी सांगितले. सरदेसाई याबाबत म्हणाले की, गोव्याचे मुख्यमंत्री एकेकाळी म्हादयीला आईपेक्षाही मोठे मानत होते.

सद्यस्थितीला कर्नाटक आक्षेपार्ह भुमिका घेत असताना मुख्यमंत्र्यांचे हे मौन बधिर करणारे आहे, या आशयाचे सरदेसाई यांनी ट्विट करत आपली भुमिका स्पष्ट केली आहे. एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना कर्नाटकचे पाटबंधारे मंत्री गोविंद करजोल म्हणाले होते की, म्हादई सिंचन प्रकल्पाचे काम कर्नाटक सरकार पूर्ण करणार आहेत. यावरुन सरदेसाई यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.

विजय सरदेसाई यांनी वारंवार मांडला म्हादई प्रश्न

यापुर्वी ही गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना पाठविले. म्हादईच्या खोऱ्यात कर्नाटक सरकार लहान बंधारे बांधून आता पाणी वळविण्याचा डाव खेळत आहे. गोवा सरकारने या विरोधात त्वरित पाऊले उचलून हे प्रयत्न हाणून पाडावेत अशी मागणी करणारे पत्र पाठविले होते.

सरदेसाई यांनी मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात सरकारने म्हादईच्या खोऱ्यात जाऊन त्वरित तपासणी करावी आणि कर्नाटकचे हे कारस्थान सर्वोच्च न्यायालय आणि म्हादई पाणी तंटा लवाद यांच्यासमोर नेऊन कर्नाटक न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत असल्याचे पटवून द्यावे अशी मागणी केली होती. त्यामूळे या पुढे मुख्यमंत्री प्रमोद सावंत नेमकी काय भुमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Murder: घटस्फोट ठरला, पत्नीवर केले तलवारीने वार; डिचोलीतील खूनप्रकरणी आरोपीस 10 दिवस पोलिस कोठडी

Goa Mangroves: 'खारफुटी हटवा, खाजन वाचवा'! गोवा फाऊंडेशन कोर्टात, पंचायतींकडून पत्रे; का आलीय शेती संकटात? वाचा..

Kala Academy: '..पुन्हा छताचा तुकडा कोसळला'! कला अकादमीला समस्यांचे ग्रहण; 60 कोटींच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह

Illegal Houses Goa: एक लाख घरे होणार कायदेशीर? केवळ मालकी हक्क नसलेली घरे ‘बेकायदेशीर’ म्हणून गणली जाणार का!

Rashi Bhavishya 27 July 2025: कौटुंबिक प्रश्न सुटतील,खर्चावर नियंत्रण आवश्यक; आरोग्याची काळजी घ्या

SCROLL FOR NEXT