Goa Rain Update: गोव्यासह कोकण किनारपट्टीवर येत्या 4 तासात मुसळधारेची शक्यता

हवामान खात्यानं वर्तवला अंदाज; बळीराजा सुखावणार
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak

गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेला पाऊस आता मुसळधार कोसळणार असल्याचं वेधशाळेने स्पष्ट केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार गोव्यासह कोकण किनारपट्टीवर येत्या 4 तासात मुसळधार पाऊस कोसळणार आहे.

(Goa Rain Update Chance of heavy rain in next 4 hours along Konkan coast including Goa)

Goa Monsoon Update
दीपक नाईक यांची गोवा राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

पावसाअभावी सोकत असलेली पिके आता पुन्हा डोलताना दिसणार आहे. गेल्या 12 ते 14 दिवसांपासून पावसाने दडी मारली होती. त्यामूळे चिंतेत असलेला शेतकरी आता काहीसा सुखावणार आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून हवेतील उष्णता आणि डोंगर भागातील पाण्याचा अभाव यातून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे.

Goa Monsoon Update
Goa Panchayat Elections पंचायत निवडणुका केवळ फार्स

मिळालेल्या माहितीनुसार सध्या मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असून, तो राजस्थान ते पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. दरम्यान, पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकणात या पावसाचा प्रभाव अधिक राहणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

गोवा किनारपट्टीवर तसेच घाट परिसरात मुसळधारेची शक्यता

पुढील तीन ते चार तासांत दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीवर तसेच घाट परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे येत्या तीन चार तासांत या प्रदेशातील नागरिकांना सावध राहण्याचा इशार देण्यात आला आहे. कामाशिवाय या परिसरातील नागरिकांना बाहेर पडू नये असे आवाहनही करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com