ST reservation Dainik Gomantak
गोवा

ST reservation: 'भाजप सरकारला एसटींना आरक्षण द्यायचेच नाही'; विजय सरदेसाई यांचा आरोप

Vijai Sardesai on ST Reservation: भाजप सरकारला एसटींना आरक्षण द्यायचे नाही, हे मी वारंवार सांगत आलो आहे. विधानसभेतही ही माझी भूमिका मांडली आहे.

गोमंतक ऑनलाईन टीम

मडगाव: एसटी आरक्षणासंदर्भात मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या अंतरिम आदेशाला सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍थगिती दिली नाही, याचाच अर्थ २०२७ च्‍या विधानसभा निवडणुकीत गोव्‍यात एसटींना आरक्षण मिळणे अशक्‍य आहे. गोव्‍यातील भाजप सरकार एसटीविराेधी असल्‍याचे वारंवार त्‍यांच्‍या कृतीतून दिसून आले आहे. अशा स्‍थितीत या एसटीविरोधी सरकारला एसटी व इतर समाजांनी एकत्र येऊन धडा शिकविण्‍याची गरज आहे, अशी प्रतिक्रिया गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांनी व्‍यक्‍त केली.

भाजप सरकारला एसटींना आरक्षण द्यायचे नाही, हे मी वारंवार सांगत आलो आहे. विधानसभेतही ही माझी भूमिका मांडली आहे. आरक्षणाबाबत मुंबई उच्‍च न्‍यायालयाने दिलेल्‍या आदेशाला सर्वोच्‍च न्‍यायालयात स्‍थगिती मिळवून घेऊ, असे हे सरकार छातीठोकपणे सांगत होते. मात्र, त्‍यांना सपशेल अपयश आले आहे, असे सरदेसाई म्‍हणाले.

फक्‍त एसटींनाच नव्‍हे, तर गाेव्‍यातील इतर मागासवर्गीयांनाही जे काही फायदे मिळायला पाहिजेत ते हे सरकार देत नाही. उत्तर प्रदेशात सत्तेवर असलेले भाजप सरकार जसे ‘पिछडे, दलित आणि आदिवासी’ यांच्‍या विरोधात आहे तसेच गोवा सरकारही मागासवर्गीय समाजाच्‍या विरोधात आहे, हे सिद्ध झाले आहे. या समाजातील लाेकांनी ते जाणले पाहिजे आणि या सरकारला धडा शिकवायला पाहिजे, असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: गोवा फॉरवर्डसोबत युतीच्या चर्चेला दिल्‍लीत सकारात्मक वळण, काँग्रेसचा सावध आशावाद; पुढील बैठक निर्णायक

India First Flex Hybrid Car: भारतातील पहिली फ्लेक्स-हायब्रिड कार लॉन्च! E20 ते E85 इंधनावर धावणार टोयोटाची नवी Innova HyCross, किंमत अन् फीचर्स जाणून घ्या

ST Political Reservation: 'आरक्षणाची शेवटची आशाही मावळली'; प्रकाश वेळीप यांची खंत, अन्यायाविरोधात लोकच निर्णय घेणार

खरी कुजबुज: एका उमेदवारीवर दोघांचा दावा!

Vasco Mock Drill: वास्कोत अचानक अग्निशमन बंब, रुग्णवाहिकांची धावपळ; न्यू मॉडर्न मार्केटमध्ये मॉक ड्रिल

SCROLL FOR NEXT