CP Radhakrishnan Goa Visit Dainik Gomantak
गोवा

CP Radhakrishnan Goa Visit: उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज गोव्‍यात, घटक राज्यदिन सोहळ्‍याला शनिवारी लावणार उपस्‍थिती

vice president cp radhakrishnan goa visit: यंदाच्या गोवा घटक राज्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन हे उद्या शुक्रवारी सायंकाळी कर्नाटकातून हवाईमार्गे गोव्यात पोचतील.

Sameer Amunekar

पणजी: यंदाच्या गोवा घटक राज्यदिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन हे उद्या शुक्रवारी सायंकाळी कर्नाटकातून हवाईमार्गे गोव्यात पोचतील. त्यांचा मुक्काम लोकभवनावर असेल. शनिवारी संध्‍याकाळी ते गोव्यातून परत जातील.

उपराष्ट्रपती उद्या बंगळूरू येथे आर्ट ऑफ लिव्‍हिंग फाऊंडेशन संस्थेच्या स्थापनेला ४५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित जागतिक उत्सवात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ते कर्नाटकमधील दावणगिरी येथे बीडीटी विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या अमृतमहोत्सवी वर्धापनदिन कार्यक्रमाला उपस्थित राहतील. तेथून संध्‍याकाळी ते खास विमानाने दाबोळी विमानतळावर येतील.

कला अकादमी संकुलात ३० मे रोजी सकाळी १० वाजता होणाऱ्या घटक राज्यदिन सोहळ्यास उपराष्ट्रपती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दुपारी ते दोनापावल येथील राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेला भेट देणार आहेत. सायंकाळी ते कर्नाटककडे हवाईमार्गे प्रयाण करतील.

३१ मे रोजी उपराष्ट्रपती कर्नाटकमधील धर्मस्थळ येथील मंजुनाथ स्वामी मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर ते बेल्थंगडी येथे ‘सिरी इंडस्ट्रियल पार्क’चे उद्‌घाटन करणार आहेत. त्याच दिवशी ते केरळ दौऱ्यावर रवाना होणार आहेत.

वाहतुकीवर असतील निर्बंध

उपराष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त उद्या शुक्रवारी (ता. २९) संध्‍याकाळी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत दाबोळी विमानतळ, चिखली, कुठ्ठाळी, नवा झुआरी पूल, बांबोळी, दोनापावला यादरम्यानच्या वाहतुकीवर निर्बंध असतील. दुसऱ्या दिवशी ३० रोजी दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० यादरम्यानही हा मार्ग सर्वसामान्यांसाठी खुला असणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT