Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: वेर्णा पोलिसांची छापेमारी! 2.2 किलो गांजासह मध्य प्रदेशच्या तरूणाला रंगेहाथ पकडले

Goa Crime: राज्यात मागील काही दिवसांपासून गोवा पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात धडक कारवाया सुरू केल्या असून, सोमवारी (२१ जुलै) त्यांच्या या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे.

Sameer Amunekar

पणजी : राज्यात मागील काही दिवसांपासून गोवा पोलिसांनी अमली पदार्थ विरोधात धडक कारवाया सुरू केल्या असून, सोमवारी (२१ जुलै) त्यांच्या या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. वेर्णा पोलिसांनी पिरनी सर्कल बस स्टॉपच्या मागील भागात छापा टाकत २.२ किलो गांजासह एकाला अटक केली आहे.

अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव राहुल कुमार केरवट (वय २८) असून तो मूळचा मध्य प्रदेशचा रहिवासी आहे आणि सध्या वेर्ण्यात वास्तव्यास होता. पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केलेल्या गांजाची बाजारमूल्य २ लाख २१ हजार ३८० रुपये इतकी असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील पर्यटकांची वर्दळ असलेल्या हणजूण, वागातोर, बागा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून अमली पदार्थांची वाढती तस्करी पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळेच पोलीस यंत्रणेने या भागात विशेष लक्ष केंद्रित केले आहे.

याआधीही, १७ जुलै रोजी डिचोली पोलिसांनी शिरगाव परिसरात मध्यरात्री कारवाई करत एका स्थानिक युवकाला गांजासह अटक केली होती. त्याच्याकडून २२८ ग्रॅम गांजा, एक स्कूटर व मोबाईल जप्त करण्यात आला होता.

राज्यातील अमली पदार्थांच्या साखळीवर तोडगा काढण्यासाठी विविध पोलीस ठाण्यांमार्फत विशेष पथक तयार करण्यात आली आहेत. स्थानिकांच्या सहकार्याने अशा प्रकारच्या कारवायांना अधिक बळ मिळणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Theft: ताळगाव झाले आता गणेशपुरी! गुन्हेगारीचा छडा लागेल का? पोलिस दलासमोर दुहेरी आव्हान

Goa: 'गोव्यातील शेतकऱ्यांनी शेती केली नाही, तर पुढील पिढी शेतात उतरणार नाही', CM सावंतांनी व्यक्त केली भिती

Goa Petrol Diesel Prices: गोव्यात सध्या पेट्रोल - डिझेलचे दर काय आहेत? जाणून घ्या ताजे भाव

Taleband Lake: तळेबांद तलाव प्रदूषित! शेतकऱ्यांवर कोसळले संकट; चौकशीची होतेय मागणी

Punav Utsav: ‘देवाच्या पुनवे’ला उसळली गर्दी! देवी सातेरी, भगवतीचा उत्सव; आगरवाडा, पार्सेवासीय भक्तीत दंग

SCROLL FOR NEXT