Verna Police FIR Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: सावत्र बाप निघाला 'नराधम'! 20 महिने अल्पवयीन मुलाचा लैंगिक छळ; दिली जीवे मारण्याची धमकी

stepfather sexual abuse Goa: एका अल्पवयीन मुलावर त्याच्याच सावत्र बापाने दीर्घकाळापासून लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना

Akshata Chhatre

साकवाळ: राज्यात घडलेल्या एका क्रूर घटनेने सध्या सर्वांनाच हादरवले आहे. साकवाळ येथे एका अल्पवयीन मुलावर त्याच्याच सावत्र बापाने दीर्घकाळापासून लैंगिक अत्याचार केल्याची अत्यंत गंभीर आणि संतापजनक घटना समोर आली असून या प्रकरणी वेर्णा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.

सावत्र बापाचे क्रौर्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलाच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर हे क्रूर कृत्य उघडकीस आले. तक्रारदार महिलेने पोलिसांना सांगितले की, २०२३ पासून आरोपी, जो मुलाचा सावत्र बाप आहे, वारंवार मुलाचा लैंगिक छळ करत होता. आईने तक्रारीत पुढे आरोप केला आहे की, आरोपीने मुलाला हे प्रकार कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती, ज्यामुळे मुलगा घाबरून गप्प बसला होता.

गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल

आईच्या तक्रारीवरून वर्णा पोलिसांनी तात्काळ कारवाई केली आहे. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३५१(३), पॉक्सो (POCSO) कायदा कलम ५(१)(एम)(एन) आणि कलम ६ आणि गोवा बाल कायदा, २००३ (Goa Children’s Act, 2003) कलम ८(२) अशा अत्यंत गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास वेर्णा पोलिस स्टेशनच्या पीएसआय प्रमिला फर्नांडिस करत आहेत, ज्यांना पीआय आनंद शिरोडकर यांचे पर्यवेक्षण आणि मडगाव डीव्हयएसपी गुरुदास कदम यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cabinet Decision: मुख्य अभियंत्यासाठी वयाची अट शिथिल, कंत्राटी कर्मचाऱ्यांना सहावा वेतन आयोग, ईपीएफ परतावा, वाचा गोवा कॅबिनेटचे तीन मोठे निर्णय?

Pooja Naik: "मी तेव्हा आमदारच नव्हतो", "माझं नाव असेल तर शोधा"; नोकरी घोटाळ्यावर मंत्र्यांच्या सावध प्रतिक्रिया

Goa Film Industry: कोकणी सिनेमा बनवायचा झाल्यास 'कोटी' रुपये गोव्यातील निर्माता कोठून आणेल?

IFFI Golden Peacock Award: कुणाला मिळणार 'गोल्डन पिकॉक' अवॉर्ड? उत्सुकता शिगेला..

Karapur Sarvona: ..आणि 'तो' मीटिंगमधून पळाला! कारापूर-सर्वण पंचायतीत गोंधळ; 2 महिला पंचसदस्‍यांना शिवीगाळामुळे गदारोळ

SCROLL FOR NEXT