The verdict in the rape case against Tarun Tejpal has been postponed till May 21. 
गोवा

Tarun Tejpal Case: तेजपाल विरोधातील बलात्कारप्रकरणाचा निवाडा 21 मेपर्यंत तहकूब

दैनिक गोमंतक

तेहलकाचे (tehelka) माजी संपादक तरुण तेजपाल (Tarun Tejpal) प्रकरणाचा निवाडा आता बुधवार 21 मे रोजी सकाळी 10.30  पर्यंत तहकूब करण्यात आला आहे. या न्यायालयात वीज पुरवठ्याची समस्या असल्याने हा निवाडा आता सुमारे दोन दिवसांनंतर होणार आहे, असे यासंदर्भात म्हापसा येथील जिल्हा न्यायालयाच्या न्या. शमा जोशी यांनी स्पष्ट केले आहे. (The verdict in the rape case against Tarun Tejpal has been postponed till May 21.)

आज बुधवारी या प्रकरणी अंतिम निवाडा अपेक्षित होता. या अगोदर तेजपाल यांच्या विरोधात म्हापसा येथील न्यायालयात यक्तिवाद पूर्ण झाले होते व त्यावर 12 मे रोजी निवाडा जाहीर होणार होता; पण, त्या वेळी तो निवाडा बुधवार 19 मे रोजी सकाळी 10.30 पर्यंत तहकूब करीत असल्याचे म्हापसा येथील जिल्हा न्यायालयाच्या न्या. शमा जोशी यांनी जाहीर केले होते.

या प्रकरणी तेजपाल याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या 376 (बलात्कार) 341, 342, 354 अ व 354ब या कलमांन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. सहकारी तरुणीचे लैगिक शोषण केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. सुमारे सात वर्षांपूर्वी अर्थांत वर्ष 2013 मध्ये गोव्यात बांबोळी येथील एका तारांकित हॉटेलमध्ये झालेल्या ‘थिंक फेस्टिव्हल’च्या दरम्यान हे प्रकरण घडले होते व ते राष्ट्रीय पातळीवर बरेच गाजले होते. तरुण तेजपाल सध्या सशर्त जामिनावर होता.

तरुण तेजपाल याने एका महिला सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार पोलिस स्थानकात सादर केल्यानंतर ते प्रकरण अतिशय संवेदनशील तथा गंभीर स्वरूपाचे असल्याने त्याचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला होता. काइम ब्रांचच्या तत्कालीन निरीक्षक तथा विद्यमान पोलिस उपअधीक्षक सुनिता सावंत यांनी त्या प्रकरणाचा तपास करून तेजपाल याच्याविरोधात आरोपपत्र सादर केले होते. या खटल्यावरील सुनावणी इन कॅमेरा घेण्यात आली होती. या खटल्यावरील सुनावणी लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी असे निर्देश यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्या अनुषंगाने मागच्या समारे सहा महिन्यांत ती सुनावणी तेजगतीने घेण्यात आली होती.

बलात्कार झाल्याची तक्रार सादर केल्यानंतर संशयिताला अटक झाली होती व त्याला सुमारे सहा महिने कोठडीत राहावे लागले होते. या खटल्यावरील सुनावणीवेळी बचाव पक्षातर्फे चार जणांच्या साक्षी नोंदवल्या होत्या. तसेच, अन्य किमान ८० जणांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या होत्या. या प्रकरणाचा तपास सुरू असताना संशयिताने जिल्हा व सत्र न्यायालयात व उच्च न्यायालयातही जामिनासाठी अर्ज केला होता. अखेरीस खटल्याची सुनावणी प्राधान्यक्रमाने घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश देत सर्वोच्च न्यायालयाने त्याला सशर्त जामीन दिला होता.

सुनावणीवेळी संशयिताच्या वकिलांकडून उलटतपासणीवेळी अनेक प्रश्न विचारून स्वत:चे मानसिक संतुलन बिघडवण्याचा प्रयत्न झाल्याचे नमूद करून पीडित तरुणीने उच्च न्यायालयात अर्ज सादर केला होता. सुमारे एक महिन्याहून अधिक काळ तिची ही उलटतपासणी सुरू होती. घटनेशी संबंधित नसलेल्या प्रश्नांचा भडीमार उलटतपासणीवेळी केल्याने तिने तो अर्ज केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

SCROLL FOR NEXT