Silly Souls Bar And Restaurant Dainik Gomantak
गोवा

Silly Souls Restaurant Goa: 20 ऑक्टोबर रोजी होणार ‘सिली सोल्स’चा निर्णय

1 जानेवारी 2021 पासून 10वर्षांच्या कालावधीसाठी 50 हजार रुपये मासिक भाड्याने ‘एटॉल फूड ॲण्ड बेव्हरेजेस ‘यांना दिले होते.

दैनिक गोमन्तक

पणजी: केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कुटुंबीयांकडून कथितरित्या चालविल्या जाणाऱ्या आसगाव येथील ‘सिली सोल्स कॅफे ॲण्ड बार’च्या वादग्रस्त कथित मद्य परवान्यासंदर्भातील ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांच्या तक्रारीवरील अंतिम सुनावणी अबकारी आयुक्त नारायण गाड यांच्यासमोर आज पूर्ण झाली. त्यावरील निर्णय 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे सध्या बंद असलेल्या सिली सोल्सचे भवितव्य त्या दिवशीच ठरणार आहे.

(Silly Souls Bar And Restaurant)

सिली सोल्स कॅफे ॲण्ड बारचे मालक ॲन्थनी डि गामा यांनी हे आस्थापन 1 जानेवारी 2021 पासून 10वर्षांच्या कालावधीसाठी 50 हजार रुपये मासिक भाड्याने ‘एटॉल फूड ॲण्ड बेव्हरेजेस ‘यांना दिले होते. त्यासंदर्भातील कागदोपत्री व्यवहारही झाला होता. सिली सोल्स कॅफे ॲण्ड बारसाठी वापरलेला जीएसटी क्रमांक ‘एटॉल फूड ॲण्ड बेव्हरेजेस’चा असून अन्न व औषध प्रशासनाकडून घेतलेला परवानाही त्यांच्याच नावावर आहे.

कोविड तसेच लॉकडाऊनचा फायदा उठवून डि गामा यांनी काही माहिती लपवून ठेवून अबकारी खात्याकडून मद्य परवाना मिळवला होता.

त्यामुळे डि गामा यांनी मद्य परवान्यासाठी अर्ज करून गोवा उत्पादन शुल्क कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याने यामध्ये बनवेगिरी उघड होत आहे. यापुढे अशाप्रकारे कोणीही बनवेगिरी करण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी समाजात कठोर संदेश जाण्यासाठी खात्याने बनवेगिरीप्रकरणी फौजदारी कारवाई करण्याचा आदेश द्यावा, अशी विनंती तक्रारदार ॲड. आयरिश रॉड्रिग्स यांनी केली आहे.

इराणी हेच संचालक

डि गामा यांनी 5 जानेवारी 2021 रोजी अबकारी खात्याकडे मद्य परवान्यासाठी अर्ज केला, तेव्हा सिली सोल्स हे ‘एटॉल फूड ॲण्ड बेव्हरेजेस’कडे होते व त्यांची उग्रया मर्कंटाईल प्रा.लि.शी भागीदारी आहे, ज्याचे केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांचे पती झुबीन इराणी हे संचालक आहेत, हे आज पुराव्यानिशी रॉड्रिग्स यांनी युक्तिवाद करताना सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT