Goa CM Pramod Sawant: गोवा राज्याला आयुर्वेदिक हब बनवणार! मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

परिषदेची पूर्वतयारी : 8 ते 10 डिसेंबरदरम्यान विश्व आयुर्वेद काँग्रेसचे आयोजन
Goa CM Pramod-Sawant
Goa CM Pramod-SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या गोवा राज्याला आयुर्वेदिक हब बनवल्यास मेडिकल टुरिझमचा मोठा फायदा होईल. त्या दिशेने आमचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. विश्व आयुर्वेदिक काँग्रेसच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

(Goa will make the state an Ayurvedic hub says cm pramod sawant)

Goa CM Pramod-Sawant
Goa News: दिलासा! युके ई-व्हिसा प्रश्‍न सोमवारपर्यंत सुटणार

गोव्यात 8 ते 11 डिसेंबरदरम्यान 9 वी विश्व आयुर्वेद काँग्रेस होणार आहे. यात जगभरातून पाच हजारांपेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. विविध सत्रांमध्ये ही परिषद होईल. या परिषदेच्या पूर्वतयारीस आज प्रारंभ झाला. यावेळी केंद्रीय आयुष मंत्री सर्वानंद सोनोवाल, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात आयुर्वेदिक उपचार पद्धतीचा प्रचार, प्रसार आणि साधनसुविधा निर्माण केल्यास जगभरातून चांगला प्रतिसाद लाभेल. यासाठीच आम्ही राज्यातील सर्व 41 प्राथमिक आणि उपविभागीय आरोग्य केंद्रांत आयुर्वेद उपचार पद्धतीची सुविधा सुरू करत आहोत. त्यासाठी स्वतंत्र डॉक्टरांची नेमणूक करण्यात येणार आहे. रायबंदर येथील रुग्णालयात आयुर्वेद, होमिओपॅथिक, युनानी आणि योग बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यात येणार आहे.

Goa CM Pramod-Sawant
Goa Monsoon Update: येत्या चार-पाच दिवसांत राज्यात परतणार पाऊस

राष्ट्रीय आयुष मिशनअंतर्गत येत्या काही दिवसांत दक्षिण आणि उत्तर या दोन्हीही जिल्ह्यांमध्ये 50 खाटांचे स्वतंत्र आयुर्वेदिक रुग्णालय सुरू होईल. उत्तर गोव्यात धारगळ येथे उभारलेले आयुष मंत्रालयाचे आयुर्वेदिक संशोधन आणि उपचार संस्थानही लवकरच राज्याच्या वैद्यकीय क्षेत्रात सामील होईल. या माध्यमातून राज्यात आयुर्वेद क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणात साधनसुविधा उभारल्या जात आहेत. केरळसारख्या सुविधा गोव्यात उपलब्ध झाल्यास त्याचा फायदा राज्यातील नागरिकांबरोबर पर्यटकांनाही होईल.

‘हर दिन, हर घर आयुर्वेद’

23 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती असते. हा दिवस आयुर्वेद दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने ‘हर दिन, हर घर आयुर्वेद’ यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

‘आयुष’चे 8 डिसेंबरला उद्‌घाटन शक्य : केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाच्या वतीने धारगळ येथे उभारलेल्या 500 खाटांच्या आयुर्वेद संशोधन आणि उपचार संस्थानचे उद्‌घाटन 8 डिसेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. या समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उपस्थित राहाण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com