Verca Beach Damage Dainik Gomantak
गोवा

Verca Beach: वार्का किनाऱ्यावर वाळूपट्ट्याचा विध्‍वंस! अज्ञातांचा कारभार; समुद्राचे पाणी शेतात घुसण्याची भीती

Verca Beach Damage: वार्का समुद्रकिनाऱ्यावर अज्ञात व्‍यक्‍तींकडून मोठ्या प्रमाणावर सँड ड्यून्‍सचा विध्‍वंस करण्‍यात आला असून या प्रकरणात स्‍थानिकांनी किनारपट्टी प्राधिकरण आणि कोलवा पोलिसांत तक्रार दिली आहे.

Sameer Panditrao

मडगाव: वार्का समुद्रकिनाऱ्यावर काही अज्ञात व्‍यक्‍तींकडून मोठ्या प्रमाणावर सँड ड्यून्‍सचा विध्‍वंस करण्‍यात आला असून या प्रकरणात स्‍थानिकांनी किनारपट्टी व्‍यवस्‍थान प्राधिकरण आणि कोलवा पोलिसांत तक्रार दिली आहे. हा वाळूचा पट्टा कापल्‍याने समुद्राचे पाणी जवळच्‍या शेतात शिरून शेताचा विध्‍वंस होऊ शकतो, अशी भीती स्‍थानिकांनी व्‍यक्‍त केली आहे.

स्‍थानिकांनी पेड-वार्का येथे झालेल्‍या या विध्‍वंसावर प्रसारमाध्‍यमांद्वारे उजेड पाडला. यावेळी बाप्तिस्‍त फर्नांडिस यांनी पोकलीनचा वापर करून हा वाळूचा पट्टा खणला आहे, हे कुणाचे कारस्‍थान ते आम्‍हाला माहिती नाही.

मात्र, ऐन पावसाळ्‍यात ज्‍यावेळी समुद्रातील पाणी वाढते त्‍यावेळी असा प्रकार केल्‍याने समुद्राचे पाणी आता शेतात शिरून मोठ्या प्रमाणावर नासाडी होऊ शकते, याकडे त्‍यांनी लक्ष वेधले. हा प्रकार आम्‍ही स्‍थानिक आमदार वेन्झी व्‍हिएगस यांच्‍या कानावर घातला आहे. त्‍यांनी यासंबंधी चौकशी करावी, अशी मागणी फर्नांडिस यांनी केली.

दुष्परिणाम शक्य

अशाप्रकारे समुद्र किनाऱ्यावरील सँड ड्यून्‍सचा विध्‍वंस केल्यास पर्यावरणावर त्याचे विपरित परिणाम होऊ शकतात, तसेच परिसराचीही मोठी हानी हाेऊ शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

आंबा खाताय की विष? कॅल्शिअम कार्बाइडचा नफेखोरीसाठी वापर; ग्राहकांच्या जिवाशी खेळ सुरु

Goa Police: गोव्यातील 25 मोठे गुन्हे क्राईम ब्रांचच्या ताब्यात ! गुंतागुंतीच्या प्रकरणांचा तपास आता वेगाने; पोलीस ठाण्यांतून गुन्हे वर्ग

पंतप्रधानांना कोर्टात खेचण्याची भाषा अन् तासाच न्यायाधीशाची उचलबांगडी, पाकिस्तानात रंगलं नाट्य; लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप

Mopa Airport : मोपा विमानतळ विकास की कासारवर्णे गावाचा विनाश ? ग्रामस्थ संतप्त ; पावसाळ्यात उद्‍भवते पूरसंकट

Yuti Yog 2026: "शुक्र-गुरुच्या युतीने चमकणार नशिबाचा तारा!" पैसा, प्रतिष्ठा अन् मालमत्तेचे व्यवहार होणार फत्ते; 4 राशींसाठी युती योग ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT