Goa Tourism Decline
Goa Beach Shack, Goa TourismDainik Gomantak

Goa Beach Shacks: बीच शॅक्‍सबाबत मोठी बातमी! बांधणीसाठी पारंपरिक साहित्य अनिवार्य; ‘पर्यटन’च्या आराखड्याला प्राधिकरणाचा ब्रेक

Goa Shacks Policy: कोलवा, बाणावली, हरमल आणि कळंगुट या चार किनाऱ्यांवर नव्या पद्धतीने बांधले जाणारे शॅक्‍स ‘कॉम्पोझिट बांबू’ वापरून तयार करण्यात येतील असा दावा महामंडळाने केला होता.
Published on

पणजी: गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने पर्यटन खात्याच्या विशेष उद्देशासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘मॉडेल शॅक’ प्रकल्पावर आक्षेप घेत स्पष्ट संदेश दिला आहे की, किनाऱ्यांवर शॅक्‍स बांधण्यासाठी पर्यावरणपूरक, पारंपरिक साहित्य वापरणे अनिवार्य असेल. त्यामुळे गोवा पर्यटन विकास महामंडळाच्या चार प्रमुख किनाऱ्यांवरील शॅक्‍स आराखड्याला धक्का बसला आहे.

कोलवा, बाणावली, हरमल आणि कळंगुट या चार किनाऱ्यांवर नव्या पद्धतीने बांधले जाणारे शॅक्‍स ‘कॉम्पोझिट बांबू’ वापरून तयार करण्यात येतील असा दावा महामंडळाने केला होता. मात्र, प्राधिकरणाच्या आढावा बैठकीत या प्रस्तावाची तपासणी करताना प्राधिकरणाने नमूद केले की शॅक्‍स बांधण्यासाठी माइल्ड स्टील, सिमेंट बोर्ड यासारख्या पारंपरिक साहित्याचा वापर करण्यात येणार आहे.

Goa Tourism Decline
Goa Beach Shack: पावसाने पाणी किनाऱ्यांवर चढू लागले, शॅक मालकांकडून मुदतवाढीचा अर्ज मागे; फटका बसल्याचे मान्य

प्राधिकरणाने केलेल्या प्रत्यक्ष पाहणीत हेही स्पष्ट झाले की, शॅक्‍सच्या प्रस्तावित जागांपैकी काही भाग संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रांमध्ये मोडतात. काही जागा ‘नो-डेव्हलपमेंट झोन’, इंटरटायडल क्षेत्र व वाळूच्या डोंगरांच्या अगदी जवळ आहेत, हे सर्व क्षेत्र सागरी अधिनियमांनुसार संरक्षित आहेत.

Goa Tourism Decline
Goa Beach Shack: खुशखबर! जूनमध्ये वाढले पर्यटक, बीच शॅक्सना मुदतवाढ द्या; व्यावसायिकांकडून होतेय मागणी

या सगळ्या घडामोडींमुळे महामंडळाचा महत्त्वाकांक्षी ‘मॉडेल शॅक्‍स’ प्रकल्प आता अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडला आहे. पर्यावरणीय आक्षेपांना उत्तर देणाऱ्या नव्या आराखड्यावरच या प्रकल्पाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. किनाऱ्यांवरील विकास करताना आता पारंपरिक आणि पर्यावरणस्नेही मार्गच स्वीकारावा लागणार असल्याचे संकेत या निर्णयामुळे मिळाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com