Goa Firing | Arrest  Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: पार्किंगच्या वादातून हवेत गोळीबार! नेमबाजी स्पर्धेतील प्रशिक्षकाचे कृत्य

Goa Firing: अपंगत्वावरून धमकी देत शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सराईत गुंड आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime Updates

म्हापसा: दिल्लीहून राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेच्या पात्रता फेरीसाठी गोव्यात दाखल झालेल्या खेळाडूंसोबत पार्किंगच्या वादातून म्हापशातील एका हिस्ट्रीशीटरने त्यांच्यासोबत हुज्जत घातली. यावेळी नेमबाजी स्पर्धेतील विद्यार्थ्यांच्या प्रशिक्षकाने स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केल्याने खळबळ उडाली.

यावेळी एकाच्या अपंगत्वावरून संबंधितास धमकी देत शिवीगाळ आणि मारहाण केल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी सराईत गुंड शैलेश गरड आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला. तसेच गरड आणि त्याचा साथीदार सौरभ डावणे (वय २४ वर्षे, रा. पेडे-म्हापसा) याला पोलिसांनी अटक केली. या प्रकरणातील गरडचे इतर साथीदार फरार आहेत.

म्हापसा पोलिसांच्या माहितीनुसार, हा प्रकार २३ रोजी, रात्री ११.४५ च्या सुमारास घडला. याप्रकरणी विशाल शौकीन (२२, दिल्ली) हे फिर्यादी आहेत. विशाल शौकीन हे प्रशिक्षक असून ते दोन विद्यार्थ्यांसोबत गोव्यात उतरले होते. मांद्रे येथील एका शूटिंग अ‍कादमीस्थळी राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेची पात्रता फेरी सुरू आहे.

शुक्रवारी रात्री शौकीन हे विद्यार्थ्यांसोबत करासवाडा, म्हापसा येथे जेवण करण्यासाठी रेंट-अ-कारने आले होते. तिथे संशयित गरडने त्यांच्या गाडीसमोर आपली गाडी पार्क केली. मागील बाजूनेही गाडी उभी होती. परिणामी शौकीन यांना कार काढण्यात अडथळा निर्माण होऊ लागला. त्यामुळे त्यांनी हॉर्न वाजवून संबंधितांना गाडी बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी गरड आणि त्याच्या साथीदारांनी शौकीनसोबत हुज्जत घातली. गरडने शौकीन यांच्या कानशिलात लगावली. तसेच संबंधितास शिवीगाळ करून धमकी दिली.

याप्रकरणी पोलिसांनी शैलेश गरड व अन्य साथीदारांविरोधात गुन्हा नोंद केला. तसेच गरड आणि डावणे यांना अटक केली. पुढील तपास पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर, निरीक्षक निखिल पालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक बाबलो परब करीत आहेत.

प्रशिक्षकांना मारहाण आणि धमकी

अनपेक्षितपणे मारहाण झाल्यामुळे शौकीन हे घाबरले. कारण नवख्या जागेत त्यांच्यासोबत गुंडगिरी सुरू होती तसेच त्यांच्यासोबत दोन विद्यार्थीही होते. त्यात एकजण अल्पवयीन (१७ वर्षीय) होता. त्यामुळे शौकीन यांनी एअर पिस्तुल काढून हवेत झाडले. संशयितांना घाबरविण्यासाठी तसेच स्वसंरक्षणासाठी त्यांनी हवेत गोळीबार केला.

सराईत गुंड शैलेश गरड आणि त्याच्या साथीदारांनी तिघांसोबत पार्किंगवरून फिर्यादीला मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या फिर्यादीने स्वसंरक्षणार्थ हवेत गोळीबार केला. शैलेश हा सराईत गुंड असून त्याच्या विरोधात सात गंभीर गुन्हे नोंद आहेत. याप्रकरणी खेळाडूंनी पोलिसांत तक्रार नोंदविली आहे.
अक्षत कौशल, पोलिस अधीक्षक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa AAP: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आता गोवा आपच्या प्रभारी; नियुक्ती होताच भाजपवर केला हल्लाबोल

Governor of Goa: पी. अशोक गजपती राजू यांचा शपथविधी संपन्न; गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून सूत्र हाती

Damodar Saptah 2025: जय जय रामकृष्ण हरी! श्री दामोदर भजनी सप्ताहाचे 126 वे वर्ष; रंगणार खास मैफील

Goa Live News: "पी.अशोक गजपती राजू यांचे मी स्वागत करतो" डॉ. प्रमोद सावंत (मुख्यमंत्री)

Google New AI Feature: गुगलचं नवं 'एआय' फीचर लाँच; माहिती शोधणं होणार अधिक अचूक

SCROLL FOR NEXT