Velsao Railway Doubling Dainik Gomantak
गोवा

Velsao: वेळसावात रेल्वे अधिकारी स्थानिकांमध्ये संघर्ष, रेल्वेमार्ग दुपदरीकरणावरुन गोंधळ; वेर्णा पोलिसांनी केली मध्यस्थी

Velsao Railway Track Doubling: वेळसाव येथील प्राईमरो वाडो येथे रेलमार्ग दुपदरीकरणाचे काम करण्यासाठी रेल्वे विकास निगमने मोठे ट्रक, जेसीबी व इतर यंत्रणा आणली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

Velsao railway doubling work conflict with locals

वास्को: वेळसाव येथे रेलमार्ग दुपदरीकरणाचे काम करण्यासाठी गुरुवारी सकाळी आलेल्या रेल्वे विकास निगमच्या अधिकारी व स्थानिकामध्ये संघर्षाची ठिणगी उडाली.

वेर्णा पोलिसांनी काही तासांनंतर मध्यस्थी केल्यावर तसेच रेल्वे विकास निगमच्या अधिकाऱ्यांना सदर जमिनीसंबंधी कागदपत्रे दाखविण्यास सांगितल्यावर निगमच्या अधिकाऱ्यांनी काम बंद केले. त्यानंतर तेथील यंत्रणा हटविली. या जमिनीसंबंधीच्या वादावर १७ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यामुळे हा वाद प्रलंबित असतानाही निगमचे अधिकारी तेथे काम करीत असल्याबद्दल आश्र्चर्य व्यक्त होत आहे.

वेळसाव येथील प्राईमरो वाडो येथे रेलमार्ग दुपदरीकरणाचे काम करण्यासाठी रेल्वे विकास निगमने मोठे ट्रक, जेसीबी व इतर यंत्रणा आणली होती. त्यामुळे तेथे स्थानिक जमले. त्यांनी तेथे काम सुरू करण्यास विरोध केला. त्यामुळे तेथे वेर्णा पोलिस दाखल झाले. संघर्षाची भाषा सुरू झाल्याने तेथे वेर्णा व वास्को पोलिस स्थानकातील आणखी कुमक मागविण्यात आली. आपल्या वडिलोपार्जित जमिनीचे रक्षण करण्यासाठी स्थानिक तेथे जमले.

कागदपत्रे नसल्याने यंत्रणा माघारी

याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते ओर्विल दोरादो रॉड्रिग्ज यांनी घटनास्थळी येऊन पोलिसांना कागदपत्रे दाखविली. याप्रकरणी १७ फेब्रुवारीला सुनावणी असल्याचे आणि हे काम थांबविण्यासंबंधी वेळसाव पंचायतीने नोटीस जारी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित पोलिस उपनिरीक्षकाने तेथील रेल्वे विकास निगमच्या अधिकाऱ्यांकडे कागदपत्रांची मागणी केली, तेव्हा त्यांनी ती दाखविण्यास असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे तेथील काम बंद करण्याची सूचना करण्यात आली. नंतर तेथील यंत्रसामग्री परत नेण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dawood Ibrahim Property: दाऊद इब्राहिमला मोठा धक्का! रत्नागिरीतील वडिलोपार्जित जमिनीचा लिलाव; गुन्हेगारी साम्राज्यातील मालमत्तेवर सरकारची टाच

Israeli Soldier Iranian Girl Love Story: दुश्मनी विसरुन बांधली प्रेमाची गाठ! इस्रायली फौजी अन् इराणी सुंदरीची 'लव्हस्टोरी'; युद्धाच्या रणधुमाळीत उरकला साखरपुडा

VIDEO: सर जडेजाच्या फिरकीचा खेळ खल्लास! वैभव सूर्यवंशीनं केली चौकार-षटकारांची बरसात; बॅटिंगचा थरार पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Horoscope 20 March 2026: 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव! सुख-सुविधा आणि प्रेमाचा योग, वाचा काय सांगते तुमचे आजचे भविष्य?

CM Pramod Sawant: मुख्यमंत्री सावंत यांच्यावर पुण्यात 'अँजिओप्लास्टी' शस्त्रक्रिया यशस्वी, प्रकृती स्थिर असल्याची डॉक्टरांची माहिती

SCROLL FOR NEXT