Velha Village Goa Dainik Gomantak
गोवा

Velha: सफर गोव्याची! ‘पूर्वेचे रोम’ म्हणून ओळखले जाणारे, कदंब साम्राज्याचे प्रमुख प्राचीन बंदर राजधानी 'गोवा वेल्हा'

Velha Village Goa: गोवा वेल्हा गावाच्या मातीत मी राहते. जन्म जरी या गावात झाला नसला तरी, लग्न होऊन चाळीस वर्षांपूर्वी या गावात आले आणि या गावच्या मातीतलीच झाले.

गोमन्तक डिजिटल टीम

माझ्या गावाच्या मातीत

घेते मी, सुखाने श्वास

कितीतरी इतिहासाच्या

खुणा आहेत, गावात खास

गोवा वेल्हा गावाच्या मातीत मी राहते. जन्म जरी या गावात झाला नसला तरी, लग्न होऊन चाळीस वर्षांपूर्वी या गावात आले आणि या गावच्या मातीतलीच झाले. मला माझ्या गावाचा खूप अभिमान आहे. पोर्तुगीजांच्या आगमनापूर्वी कदंबकालीन राजवटीत गोवा वेल्हा गोपकपट्टण म्हणून ओळखले जात होते. कदंब साम्राज्याची ती प्रमुख प्राचीन बंदर राजधानी होती, असं आम्हाला वाचायला मिळते.

आणि अशा या ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या गावात माझं वास्तव्य हे माझं भाग्यच म्हणेन मी. या माझ्या गावात सगळ्यां धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. माझ्या गावात देवी चामुंडीचा संचार आहे, जी नवसाला पावणारी देवी आहे. तसेच सांत आंद्रेची चर्च पण आहे जे आमच्या गावाचे रक्षण करत आहे. ज्याच्यावरून सान्त आंद्रे हा मतदार संघ ओळखला जातो.

पिलार येथे पाद्र आग्नेल सेमिनारी आहे, जेथे गोव्याचे लोक येऊन नवस बोलतात. गावाच्या दोन तीन किलोमीटरवर संत आना या सायबिणीचे चर्च आहे जिथे कोणाला मुलं नाहीत, ते भाविक काकडी ठेवून ‘घे पीपीन दे मिनीन’ म्हणत नवस बोलतात आणि तिच्या मागण्याने कित्येकांची कूस उजवलेली आम्ही बघितलेली आहे. काकडी पायाशी ठेवून हा नवस मग फेडला जातो. त्याला ‘तवश्यांचे फेस्त’ असे संबोधले जाते.

१६व्या–१७व्या शतकात गोवा वेल्हा हे आशियातील प्रमुख ख्रिस्ती धर्मप्रसाराचे केंद्र होते. एकेकाळी याला ‘पूर्वेचे रोम’ असे म्हटले जात असे.

१८४३ मध्ये राजधानी पणजी येथे हलविण्यात आली. गोवा वेल्हा येथील चर्च समूहाला ‘युनेस्को’ कडून जागतिक वारसा स्थळ असा दर्जा मिळाला आहे. आमच्या गावचे एक मोठे आकर्षण म्हणजे संताचे पुरसावं जे एक रोम देशात होते, आणि या आमच्या गावात.

तेहतीस संतांची मिरवणूक काढली जाते. आणि आम्ही हिंदू लोक भक्तीने त्यात सहभागी होतो. शिरदोन समुद्र किनारा तसेच चाळीस वर्षांपूर्वी माडाशेतांनी बहरलेला माझा गाव हिरवागार होता. मासेमारी मोठ्या प्रमाणात होती, लोक भाजी लावायचे, शेती करायचे त्याच्यावरच त्यांचे पोट चालायचे, पण आता शेते नाहीत, पण मोठ्या इमारती झाल्या आहेत, जादा कमाईसाठी लोक आखाती देशात जाताहेत. त्यामुळे हिरवागार असलेला माझा गाव काँक्रीटचे जंगल झालेला आहे; गावपण जपणं, पर्यावरण वाचवणं, प्रदूषण रोखणं, ही सर्वांची जबाबदारी आहे.

सुनिता पेडणेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Modi Government: मोदी सरकारसाठी पुढचे तीन महिने कसोटीचे; विरोधकांचे ‘नॅरेटिव्ह’ उलटवण्याचे आव्हान

Catch Of The Year! शुभमन गिलचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

SCROLL FOR NEXT