Agshi Police arrested 20 year old youth Dainik Gomantak
गोवा

आगशी येथे चोरट्याकडून वाहने जप्त; दोन साथीदार फरार

आगशी पोलिसांनी वाल्लिसन किंडो या 20 वर्षीय तरुणाला अटक केले.

दैनिक गोमन्तक

पणजी: समुद्रकिनारी व शहरी भागातील दुचाकी वाहनांच्या चोरीप्रकरणी आगशी पोलिसांनी वाल्लिसन किंडो या 20 वर्षीय तरुणाला अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीची चार दुचाकी वाहने जप्त केली आहेत. या चोरीमध्ये सामील असलेले त्याचे दोन साथीदार फरारी झाले आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती आगशी पोलिस ठाण्याचे निरीक्षक तुळशीदास नाईक यांनी दिली.

संशयित वाल्लिसन किंडो या तरुण रात्रीच्यावेळी आगशी येथून जात असताना त्याला अडविण्यात आले.

त्याच्याकडे असलेल्या दुचाकीवर दर्शनी भागावर क्रमांक होता तर मागे तो नव्हता. त्यामुळे त्याची चौकशी करण्यात आली. या चौकशीवेळी तो समाधानकारक उत्तरे देऊ शकला नाही त्यामुळे पोलिसांना त्याचा संशय आला. पोलिस स्थानकातील चौकशीत त्याच्याकडे असलेली दुचाकी चोरीची असल्याची कबुली दिली. त्याने व त्याच्या इतर दोन साथीदारांनी कळंगुट येथून 3 तर म्हापशातून 1 दुचाकी चोरली असल्याची माहिती दिली. इतर तीन दुचाकी त्याच्या साथीदारांच्या घराकडून जप्त केल्या. याप्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

जप्त करण्यात आलेल्या दुचाकी चोरीला गेल्याच्या तक्रारी कळंगुट व म्हापसा पोलिस स्थानकात नोंद आहेत की नाही याची शहानिशा केली जात आहे. संशयित हल्लीच एका खासगी वाहनावर चालक म्हणून कामाला लागला होता. संशयिताला न्यायालयाने पोलिस कोठडी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT