Vegetable Dainik Gomantak
गोवा

Goa Vegetable Rates: भाजीपाल्याचे दर जैसे थे! टोमॅटो, कांदा काही अंशी कमी; स्थानिक भाज्यांची आवक घटली

Vegetable Rates In Goa: राज्यात मागील दोन महिन्यांत भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. परंतु मागील दोन आठवड्यांपासून कांदा, बटाटा व इतर भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Vegetables Rates

पणजी: राज्यात मागील दोन महिन्यांत भाजीपाल्याच्या दरात सातत्याने वाढ होत होती. परंतु मागील दोन आठवड्यांपासून कांदा, बटाटा व इतर भाजीपाल्याचे दर स्थिर आहेत. टोमॅटो, कांद्याचे दर काही अंशी कमी झाले आहेत. मात्र, लसूण अजून महागलेलीच आहे.

पणजी बाजारात टोमॅटो ६० रुपये प्रतिकिलो दराने तर फलोत्पादनाच्या गाळ्यावर ३२ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. बाजारात जुना कांदा ७० रुपये व नवा कांदा ६० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. मागील दोन आठवड्यांपूर्वी टोमॅटो व कांद्याचे दर ८० रुपये किलोवर पोहोचले होते. बटाटा मात्र ५० रुपये किलो दरावर कायम आहे.

राज्यात मागील दोन-तीन महिन्यांपासून लसणीचा दर मात्र कमी झालेला नाही. मध्यम आकाराची जवारी लसूण ४०० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहे. लिंबूचे दरदेखील वाढलेले आहेत. बाजारात ५० रुपयांना लिंबांचा वाटा मिळत असून वाट्यात ७ ते ८ लिंबू असतात.

पावसाळ्यात पिकविण्यात येणाऱ्या विविध पालेभाज्या बाजारात दाखल व्हायच्या; परंतु आता पालेभाज्यांची आवक घटली आहे. आता हिव्याळ्यात शेतकऱ्यांकडून नव्याने भाजीपाला लागवड करण्यात येणार असल्याने भाजीचे मळे नांगरणीला सुरवात झाली आहे. आता बाजारात काटेकणगी, भाजीची केळी व इतर फळभाज्या येत आहेत. काटेकणगी १५० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजीमध्ये गोव्याची यशस्वी घोडदौड सुरु; अरुणाचल विरोधात कश्यपने झळकवले द्विशतक

Goa BJP: तानावडेंसमोर तवडकर ठाम! समजूत काढण्यासाठी आता पुढच्या आठवड्यात बैठक

Cuchelim: 'कुचेली कोमुनिदाद'बाबतीत गोवा खंडपीठ गंभीर! कारवाईचे दिले निर्देश; 'ती' 4 घरे पाडली जाणारच

Cash For Job: 'Viral Audio Tape' मागे बदनामी करण्याचा हेतू! आमदार गावकरांनी केली चौकशीची मागणी

Rashi Bhavishya 14 November 2024: व्यवसायातून खास फायदा होईल, आपल्या दिलदार स्वभावामुळे लोकं प्रसन्न राहतील; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

SCROLL FOR NEXT