Goa Vegetables Market  Canva
गोवा

Goa News: कांदा-टोमॅटो महागले! नवरात्रोत्सवाच्या तोंडावर दर वाढण्याचे संकेत; सर्वसामान्यांची महागाईच्या भडक्याने होरपळ

Goa Vegetable Rates: फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवरदेखील कांदा-टोमॅटोचे दर पन्नास रुपयांच्या वर आहेत. पुढील आठवडाभर राज्यात कांदा-टोमॅटोच्या दर वाढत राहणार असल्याचे विक्रेते सांगतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Vegetable Rates In Goa

पणजी: राज्यात चतुर्थीपासून सातत्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ होत आहेत. सर्वसामान्य नागरिक महागाईच्या भडक्यात होरपळत आहेत. जीवनावश्‍यक असणाऱ्या कांदा, टोमॅटोच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याने सर्वसामान्य मध्यमवर्गीयांसमोर आपल्या कुटुंबाचा गाडा कसा चालवावा, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

राजधानी पणजीत नवा कांदा ७० रुपये किलो तर जुना कांदा ८० रुपये किलो दराने विकला जात आहे. टोमॅटो ६० रुपये किलो दराने विकला जात असून भाज्यांच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फलोत्पादन महामंडळाच्या गाळ्यांवरदेखील कांदा-टोमॅटोचे दर पन्नास रुपयांच्या वर आहेत. पुढील आठवडाभर राज्यात कांदा-टोमॅटोच्या दर वाढत राहणार असल्याचे विक्रेते सांगतात.

काही दिवसांत नवरात्री उत्सव असणार असून मोठ्या प्रमाणात भाजीपाल्याला मागणी आहे. राज्यात भाजीपाला बेळगावहून (Belgaum) आयात केला जात असल्याने विक्रेत्यांचा वाहतुकीचा खर्च वाढतो, त्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

चिबूडाला मागणी

राज्यात आता मोठ्या प्रमाणात पावसाळी भाज्या बाजारात दाखल झाल्या आहेत. पावसाळ्यात शेतकऱ्यांनी लावलेल्या चिबूड, काकडी, दोडगी, भोपळा तसेच इतर भाज्यांचे पीक येऊ लागले आहे. मध्यम आकाराचा एक चिबूड १०० ते १२० ररुपयांना विकला जात आहे. बाजारात चिबूडाला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. तसेच पणजी बाजारात पन्नास रुपयांना पाच अशा दराने काकडी विकल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa River Marathon: 14 डिसेंबर रोजी रंगणार 'गोवा रिव्हर मॅरेथॉन'! साडेसात हजारांहून जास्त धावपटू होणार सहभागी

Ponda: रितेश नाईकांच्या गळ्यात माळ पडणार का? फोंड्याचा आमदार बिनविरोध निवडण्याची मागणी; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांचे मौन

Goa Politics: खरी कुजबुज; स्वतःला जेम्स बाँड समजणारा पोलिस अधिकारी

Panaji Spa Ban: पणजीत 'स्पा'ना बंदी! अखेर मनपाला आली जाग; नवीन परवानग्या दिल्या जाणार नाहीत

Siolim: वस्तू पळवायला घरात घुसल्या, स्थानिकांनी ठेवले झाडाला बांधून; शिवोलीत 2 परप्रांतीय महिलांना गावकऱ्यांनी घडवली अद्दल

SCROLL FOR NEXT