Vegetable crop destroyed by cows at Pernem Dainik Gomantak
गोवा

हळर्ण-पेडणे येथे गव्यांकडून भाजीपाला पीक उद्‌ध्वस्त

वन्यजीवांचा वाढता उपद्रव : शेतकऱ्याला हजारो रुपयांचा फटका

दैनिक गोमन्तक

पेडणे: हळर्ण येथे रणजीत परब ह्या युवा शेतकऱ्याच्या परसबागेतील भाजी उत्पन्न गव्यांनी काल रात्री फस्त केल्यामुळे पीक घेण्यासाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च व घेतलेली मेहनत वाया गेली आहे.

रणजीत परब म्हणाले की,पाच वर्षांच्या भाडेतत्वावर मी शेतजमीन कसण्यासाठी घेतली असून गेल्या तीन वर्षापासून वांगी, भेंडी आदी प्रकारच्या भाजीपाल्याचे उत्पन्न घेतो. ही भाजी फलोत्पादन महामंडळाच्या विविध ठिकाणच्या केंद्रांवर नेऊन विकतो.

भाजीपाल्याच्या विक्रीमुळे कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी चांगला हातभार लागतो. पण मी लागवड केलेली संपूर्ण भाजी परसबाग मुळासकट गव्यांनी फस्त केल्याने सुमारे सत्तर हजार रुपयांची हानी झाली. या घटनेमुळे मला मोठा आर्थिक फटका बसला आहे,असेही परब यांनी सांगितले.

पीक घेण्यासाठी कुटुंबीयांसमवेत घेतलेली मेहनत तर फुकट गेलीच, पण ज्या उत्पन्नावर आमचे कुटुंब चालायचे ते साधनच नष्ट झाल्याने माझ्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. तरी आमदार , कृषि व वन खात्याने या झालेल्या नुकसानीची पाहणी करून मला नुकसान भरपाई द्यावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: भारताच्या जिद्दीपुढे इंग्लंडचे ‘सरेंडर’! गिल, जडेजा अन् सुंदरच्या शतकांच्या जोरावर चौथा कसोटी सामना ड्रॉ

'Ayushman Card'च्या नियमात मोठा बदल, 'या' आजारांवर खाजगी रुग्णालयात मिळणार नाही मोफत उपचार

Viral Video: '...अन् हात-पाय हलवत राहिला', नाचता-नाचता रोबोटचा ‘तो’ थरारक क्षण, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल!

IND vs ENG 4th Test: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये घडला इतिहास! इंग्लंडने पटकावले पहिले स्थान; केला 'हा' नवा पराक्रम

‘बाबा, माझ्या भावाला ओरडू नका!’: 5 वर्षांची चिमुकली 3 वर्षांच्या भावासाठी बाबांसमोर ढाल बनून उभी राहिली; हृदयस्पर्शी Video Viral

SCROLL FOR NEXT