कालेतील रेल्वे उड्डाण पुलाची पाहणी

'जोड रस्त्यालगत विजेचे नवीन खांब उभारण्यात येणार'
Inspection of Kalay railway flyover
Inspection of Kalay railway flyoverDainik Gomantak
Published on
Updated on

कुडचडे: काले येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाच्या जोडरस्त्याची वीज व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी संयुक्तपणे पाहणी केली. या जोड रस्त्याच्या संरक्षक भिंतीचे काम पूर्ण झाले असून या जोड रस्त्यालगत विजेचे नवीन खांब उभारण्यात येणार आहेत, अशी माहिती वीज खात्याच्या अभियंत्यांनी दिली.

Inspection of Kalay railway flyover
कळंगुटमधील रस्त्यांची दूरवस्था

यावेळी साबांखाचे अभियंता प्रदीप पेडणेकर, समीर नाईक, वीज खात्याचे अभियंता सुभाष देसाई, शरद नाईक, ऋषिकेश नाईक, कालेचे सरपंच किशोर देसाई, सावर्डे भाजप मंडळ अध्यक्ष विलास देसाई, पंचसदस्य विराज वेरेकर, बापो शेळके, बाबलो खरात, श्रद्धा बोरकर आदी उपस्थित होते.

सरपंच किशोर देसाई म्हणाले, काले येथे बांधण्यात येणाऱ्या रेल्वे उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यात हे काम पूर्ण होईल. नंतर या पुलाचे उदघाटन होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Aryan Singh Dadiala Swimming Ajit Pawar Tribute:
Digambar Kamat Porvorim flyover announcement
Ruisha Sudhir Kharsel Death
bjp National President nitin nabin advises cm pramod sawant damu naik
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com