डिचोली: खनिज वाहतुकीवरून डिचोलीत निर्माण झालेला 'गुंता' मिटता मिटत नसून अजूनही 'वेदांता'ची खनिज वाहतूक बंदच आहे. मागण्या मान्य होईपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहणार असे आंदोलनकर्त्या शेतकरी आणि कामगारांनी स्पष्ट करून अन्य कोणत्याही रस्त्याने खनिज वाहतूक करायला देणार नाही, असा इशारा सुधाकर वायंगणकर, अनिल सालेलकर आणि इतरांनी आज (शुक्रवारी) डिचोलीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.
'वेदांता' खाणीवरील खनिज वाहतुकीचा रस्ता शेतकऱ्यांनी अडवला असून पर्यायी रस्त्यानेही खनिज वाहतूक करण्यास शेतकऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे गेल्या सतरा दिवसांपासून 'वेदांता'ची खनिज वाहतूक बंद आहे. सर्व पर्याय अपयशी ठरल्याने आता डिचोली-सारमानस या सार्वजनिक रस्त्यावरून खनिज वाहतूक करण्याच्यादृष्टीने 'वेदांता' कंपनीने हालचाली सुरू केल्या आहेत. अशी शक्यता गृहीत धरून शेतकरी आणि कामगारांमध्ये खळबळ माजली आहे.
सार्वजनिक रस्त्याला हरकत
शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असल्याने 'रस्ता बंद' आंदोलनाचा तिढा अजून सुटत नाही. डिचोली-सारमानस या सार्वजनिक रस्त्यावरून खनिज वाहतूक करण्याचा प्रयत्न झाल्यास तो हाणून पाडण्यात येईल. असे शेतकरी आणि कामगारांनी स्पष्ट केले आहे. डिचोली-सारमानस रस्त्यावरुन शेकडो वाहने नियमित ये-जा करतात. या रस्त्यावरुन खनिज वाहतूक सुरु झाल्यास नियमित प्रवास करणाऱ्या प्रवाशांसह विद्यार्थीवर्गाचे हाल होणार आहेत.
असा दावा आंदोलनकर्त्या शेतकरी आणि कामगारांनी केला आहे. खाण आणि भूगर्भ खात्याने सार्वजनिक रस्त्याने खनिज वाहतुकीसाठी परवानगी देवू नये. संभाव्य परिणाम लक्षात घेवून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनीही याप्रश्नी गंभीरतेने लक्ष घालावे, अशी मागणी शेतकरी आणि कामगारांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.