Mining  Dainik Gomantak
गोवा

Goa Mining : खाण क्षेत्राचा नवा अध्याय; स्थानिकांच्या नोकऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य

पहिल्या टप्प्यात डिचोलीतील खाणीची ई-लिलाव प्रक्रिया पार पडली

दैनिक गोमंतक

गोवा राज्यात पहिल्यांदाच खनिज खात्याने पुकारलेल्या चार खनिज ब्लॉकच्या ई-लिलावाची प्रक्रिया बुधवारपासून सुरू झाली आहे. यातील पहिल्या टप्प्यात ब्लॉक क्र. 1 ची ई-लिलाव प्रक्रिया आज ( बुधवारी ) सकाळी पडली. यामध्ये डिचोली खाण पट्टा वेदांता कंपनीला मिळाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. तसेच स्थानिकांच्या नोकऱ्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठं विधान केले आहे.

(Vedanta is the successful bidder to acquire mining Block 1, Bicholim in the first phase of auctioning)

मिळालेल्या माहितीनुसार आज पहिल्या टप्प्यात ब्लॉक क्र. 1 या डिचोलीतील खाणीची ई-लिलाव प्रक्रिया पार पडली आहे. यात वेदांताला यश मिळाले असल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे. याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, स्थानिकांच्या नोकऱ्यांचा या प्रक्रियेत विचार करण्यात आला असून खाण क्षेत्रात त्यांना नोकऱ्यांसाठी प्राधान्य दिले आहे. तसेच यापुढे ही निर्माण होणाऱ्या नोकऱ्यांसाठी स्थानिकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले आहेत.

या प्रक्रियेमुळे गोवा राज्यातील प्रदीर्घ काळ प्रलंबित खाणकामाचा प्रश्न व्यावहारिकरित्या संपुष्टात आला आहे. त्यामुळे राज्यात या पुढे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत राहतील आणि खाण क्षेत्र सतत भरभराट आणि समृद्ध होईल असा विश्वास मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला आहे.

पहिल्या टप्प्यात चार ब्लॉक्सचा लिलाव

ई-लिलावाच्या पहिल्या टप्प्यात डिचोली, शिरगाव-मये, मोंत द शिरगाव आणि काले या चार ब्लॉक्सच्या ई-लिलावाची प्रक्रिया बुधवारपासून सुरू करण्यात आली आहे.

राज्य सरकारला दुसरी लॉटरी

राज्य सरकारला खनिज निर्यातीच्या बाबतीत गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा लॉटरी लागली आहे, असेच म्हणावे लागेल. केंद्र सरकारने 58 टक्के खालील खनिज निर्यातीवरील निर्यात शुल्क रद्द केल्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला राज्यात पडून असलेले खनिज डंप हलविण्याची परवानगी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Income Tax Return: 31 जुलैची मुदत वाढणार का? आयटीआर भरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका

Dharmendra Pradhan Resigns: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर जंतर-मंतरवर जल्लोष! ‘झुकती है दुनिया, झुकाने वाला चाहिए…’,म्हणत अभिजीत दीपकेची टोलेबाजी VIDEO

Dharmendra Pradhan Resigns: सीजेपी आंदोलनापुढे अखेर मोदी सरकार झुकले! धर्मेंद्र प्रधान यांनी दिला केंद्रीय शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा

Dona Paula Car Accident: वाहन पार्किंगचा हलगर्जीपणा चालकाला पडला महागात! उतारावरून गाडी थेट गॅरेजमध्ये, आलिशान वाहनाला धडक

Goa Farmers Fertilizer Mobile App: खत खरेदीसाठी 'ऑफलाइन' पर्यायही हवा; ॲप अनिवार्य करण्याच्या सरकारच्या निर्णयावर क्रूझ सिल्वा यांची टीका

SCROLL FOR NEXT