गोव्यातील टॅक्सी व्यवसायात रशियन कंपनीची घुसखोरी?

किनारी भागात असंतोष; वीज खांबांवर रशियनांची ‘राईड नाऊ टॅक्सी’ जाहिरात
Goa Taxi
Goa TaxiDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Taxi Business : पर्यटन हंगाम हा किनारी भागातील प्रत्येक व्यावसायिकाला रोजीरोटी मिळवून देणारा काळ असतो. त्यामुळेच कित्येक कुटुंबे बँकांकडून कर्जे घेऊन व्यवसाय थाटतात. परंतु सध्या विशेषतः टॅक्सी व्यवसायात विदेशींनी घुसखोरी केल्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायाला घरघर लागली आहे. हरमल भागातील अनेक वीज खांबांवर 'राईड नाऊ टॅक्सी' अशी रशियन टॅक्सी व्यावसायिकांची जाहिरात झळकत असून स्थानिकांच्या व्यवसायावर संकट ओढवले आहे.

हरमल किनारी भागातील प्रत्येक वीज खांबांवर रशियन पर्यटकांनी टॅक्सी व्यवसायाची ‘क्यू आर कोड’सह 'राईड नाऊ टॅक्सी'अशी जाहिरात केली असून किनारी भागातील स्थानिकांचा टॅक्सी व्यवसाय धोक्यात आल्याची खंत अनेक स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी वीज खांबांवर जाहिरात करण्यास मुभा देणाऱ्यांवर कारवाई करावी. अन्यथा रशियनांनी टॅक्सी व्यवसायात बस्तान बसविल्यास गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिकांनी काय करावे, असा सवालही त्यांना एका टॅक्सी व्यावसायिकाने केला आहे.

आरोलकरांचे हटवले, मग विदेशींचे पोस्टर्स कसे चालतात ?

वीज खात्याने वर्षभरापूर्वी मांद्रे आणि अन्य भागात मगो पक्षाचे उमेदवार जीत आरोलकर यांचे वीजखांबावरील जाहिरातीचे पोस्टर्स हटवले होते. मात्र, विदेशींना कोणत्या अधिकाऱ्याने परवानगी दिली त्याची माहिती जनतेला द्यावी, असा आग्रह टॅक्सी व्यावसायिकांनी केला आहे. सदर जाहिरात करण्यास वीज खात्याशी कुणी पत्रव्यवहार केला त्याचाही तपशील प्रसिद्ध करण्याची मागणी व्यावसायिकांनी केली आहे.

Goa Taxi
Know Your Neighbour : तुमच्या शेजारी कोण राहतात? पोलिसांच्या तपासात सापडलेत नोंदणी नसलेले भाडेकरू

पर्यटन व्यवसाय धोक्यात, कारवाईची अपेक्षा !
सध्याच्या टॅक्सीच्या जाहिरातीत 100 डॉलर आकारून विमानतळावर सोडले जाते तसेच 150 डॉलर घेऊन भाडेपट्टीवरील बसेसमधून वॉटरफॉल,स्पाईस प्लांटेशन,चर्चेस आणि मंदिर असे पॅकेज दिले जाते. या बसेसकडून पर्यटकांची ही लूट नव्हे का, असा सवाल टॅक्सी व्यावसायिकाने केला आहे. माफक दर असूनही पर्यटकांची दिशाभूल केली जाते व त्यास पर्यटन खाते जबाबदार असल्याचे काही टॅक्सी व्यावसायिकांनी सांगितले.

दरम्यान गोमंतकीय टॅक्सी व्यावसायिकांना मीटर सक्ती, डिजिटल मीटर, स्पीड गव्हर्नन्स आदी बाबतीत वेठीस धरून वाहतूक खात्याने कंगाल केले. सहनशील गोवेकरांनी आर्थिक भुर्दंड सोसला. मात्र काही रशियन स्थानिकांच्या टॅक्सी व्यवसायावर गंडांतर आणत असून त्यांच्यावर वाहतूकमंत्री माविन गुदिन्होंनी कारवाई करावी, अशी मागणी टॅक्सी व्यावसायिकांनी केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com