Sada Waste Dainik Gomantak
गोवा

Sada Waste Problem: ५ कोटींचा बायोडायजेस्टर गंजून खराब; कचऱ्याचा डोंगरात मात्र वाढच

Sada Garbage Probem: २५ हजार टनांहून जास्त कचरा; केवळ संकलनावरच लक्ष केंद्रित केल्याने समस्या

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मागील चुकांपासून शिकणे हे शहाणपणाचे लक्षण मानले जाते. सगळेच शिकतात असेही नाही. मुरगाव पालिकेची सध्याची कृती चुकांपासून न शिकण्याचीच दिसते. सडा येथे साठवून ठेवलेला ९६ हजार घनमीटर कचऱ्याच्या ढिगावर कंत्राटदार नेमून सरकारी खर्चाने गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाने प्रक्रिया केली. त्यातून जाळण्यासाठी पाठवण्यात आलेला कचराही अद्याप हटवण्यात आलेला नसताना आता पालिका तेथे कचरा आणून टाकत असून नवा कचऱ्याचा ढीग जन्माला घालत असल्याचे दिसून आले. सध्याच २५ हजार टनांहून जास्त कचरा तेथे साठवला गेला आहे.

वरुणापुरीहून वास्कोच्या दिशेने जाण्यासाठी आता उन्नतमार्ग बांधण्यात आला आहे. या उंचावरील रस्त्यावरून जाताना डावीकडे समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. मुंबईच्या वरळी सी फेसची आठवण करून देणारा असा हा नितांत सुंदर परिसर आहे. त्‍याच्याच किलोमीटर पुढे अत्यंत दुर्गंधीमय परिसर असेल याची सुतराम कल्पना या मार्गावरून प्रवास करताना येत नाही. या रस्त्याला डावीकडे एक मोठे वळण आहे.

ते काढून पुढे गेल्यावर चढण लागते. ती संपल्यावर एक छोटा रस्ता डावीकडे खाली उतरतो. त्या रस्त्याला गाडी लागली की नाकाला दर्प झोंबू लागतो. गाडीतून आजूबाजूला पाहण्याचा प्रयत्न केल्यावर समोरच एक कचऱ्याचा डोंगर दिसू लागतो. गाडी जवळ येत जाते तसा त्या डोंगराचा आकार वाढू लागतो.

हा आहे वास्को शहरातील कचरा. मुरगाव पालिका हा कचरा गोळा करून तो सडा येथे सध्या साठवत असल्याचे दिसते. याआधीही कचऱ्याचा असा डोंगर पालिकेने तयार केला होता. महामंडळाने २०२० मध्ये त्यावर कंत्राटदार नेमून प्रक्रिया केली. प्रक्रिया न करता येण्याजोगा कचरा कर्नाटकातील सिमेंट फॅक्टरीत जाळण्यासाठी तेथे बांधून ठेवला आहे. त्या कचऱ्याच्या पुढेच हा नवा ढिगारा आता तयार होऊ लागला आहे.

बिटस पिलानीने ५ कोटी रुपये खर्चून बायोडायजेस्टर पालिकेला दिला. आता तो वापरात नसल्याने गंजून गेला असून त्याचा भोके पडायची बाकी आहेत. २० टन सुका तर ८ टन ओला कचरा पालिका वास्कोतून गोळा करते. सध्या हा कचरा सडा परिसरात ढिगाच्या परिसरातच फेकला जात आहे.

तेथे कुत्रे व पक्षी कचऱ्यात काय खायला मिळते का हे पाहण्यासाठी गोळा होताना दिसतात. तेथे प्लास्टिकच्या कचऱ्याचे तुकडे (बेलिंग) कऱण्यासाठी कामगार नेमलेले आहेत. ते काम करतात पण त्यांचा वेग आणि जमा होणारा कचरा यांचा मेळ बसत नसल्याने येत्या काही महिन्यांतच सडा येथील कचऱ्याचा ढिगारा हा बातम्यांत असेल हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

प्लास्टिक प्रदूषण

नेचर या जर्नलमध्ये गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या एका संशोधनात भारताचा जागतिक प्लास्टिक प्रदूषणात एक पंचमांश वाटा असल्याचे म्हटले आहे. भारतात दरवर्षी अंदाजे ५.८ दशलक्ष टन प्लास्टिक जाळले जाते. तर त्याचा उर्वरित ३.५ दशलक्ष टन कचरा (जमीन, हवा, पाणी) पर्यावरणात सोडला/ टाकला जातो. भारताचा जागतिक प्लास्टिक प्रदूषणात ९.३ दशलक्ष टन एवढा मोठा वाटा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

E-Sakal: ई-सकाळची गरुडझेप! पुन्हा ठरले देशातील नंबर 1 मराठी न्यूज पोर्टल

Vijai Sardesai: 'आत्ताच्या हुकूमशाहीपेक्षा पोर्तुगीज परवडले'; विजय सरदेसाईंचा भाजप सरकारला टोला

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND Vs ENG: गिल दा मामला...! शुभमननं मोडला किंग कोहलीचा रेकॉर्ड; पहिल्यांदाच भारतीय कर्णधाराने केली अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT