राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे वास्को मुंडवेल येथील श्री ओवळेश्वर गोपाळकृष्ण मंदिरतर्फे गौरव स्वीकारताना सोबत आमदार कार्लुस आल्मेदा व इतर. Dainik Gomantak
गोवा

Goa : वास्कोच्या विकासाला यापुढे राज्य सरकार प्राथमिकता देणार; सदानंद शेटतानावडे

दैनिक गोमन्तक

दाबोळी: आमदार कार्लुस आल्मेदा वास्को (Vasco) मतदारसंघातून (From the constituency) तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅटट्रिक साधणार आहेत. तसेच वास्कोच्या विकासाला (Vasco's development) यापुढे राज्य सरकार प्राथमिकता देऊन येथील कामे पूर्णत्वाकडे घेऊन जाणार असल्याची माहिती गोवा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष (Goa BJP state president) सदानंद शेटतानावडे (Sadanand Shet Tanavade) यांनी दिली.

राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष याने सर्व मतदार संघातील गट समित्या, महिला मोर्चा समित्या व इतर पदाधिकाऱ्यां बरोबर बैठका घेण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. सध्या भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेटतानावडे याने वास्को येथील आपल्या ११ व्या दौऱ्यात वास्को भाजप गटाच्या विविध समित्यां बरोबर बैठका घेतल्या. यावेळी त्यांच्यासमवेत वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा, वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक, सचिव यातिन कामुर्लेकर, संदीप नार्वेकर, युवा मोर्चाचे अध्यक्ष अमय चोपडेकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पुढे बोलताना अध्यक्ष तानावडे म्हणाले की आमदार आल्मेदा वास्कोत पुन्हा एकदा 2022 च्या विधानसभा निवडणूक जिंकून हॅटट्रिक साधणार आहे. आल्मेदा यांना वास्कोतील जनतेबरोबर ठेवलेल्या संपर्कामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याची माहिती तानावडे यांनी दिली. राज्य भाजप प्रदेशाध्यक्ष तानावडे याने आपल्या वास्को मतदार संघात आले असता त्याने विविध धार्मिक स्थळाची भेट घेतली.

यावेळी तानावडे, येथील श्री ओवळेश्वर गोपाळकृष्ण मंदिरात दर्शनासाठी आले असता त्यांनी संस्थेचे अध्यक्ष यशवंत परब यांनी शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला. यावेळी मंदिरात आमदार आल्मेदा, नगरसेवक फॅन्ड्रीक हेन्रीक्स, यतिन कामुर्लेकर, मंदिराचे उपाध्यक्ष उमेश भगत, अश्विन देसाई, चेतन मरुडकर, स्वप्नील नाईक, नरेश नाईक, परेश नाईक, अविष परब, प्रशांती शेट्टी, छाया परब, बाबू शेट्टी, शेखर बागकर, रमेश नाईक, सिद्धेश नाईक, दामोदर तांडेल, प्रशांत तांडेल, अरुण मांद्रेकर व इतर नागरिक उपस्थित होते. यावेळी मंदिराचे मुख्य पुरोहित सुब्रमण्यम भट यांनी सामूहिक गाराने घातले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार, डिचोलीत गॅरेजमधील दुचाकींना आग; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Mahalaya Pitru Paksha Shraddh 2024: श्राद्ध का करावे?

Ratnagiri Crime: स्वप्न, मृतदेह! खेड, रत्नागिरी प्रकरणात नवा ट्विस्ट; आर्याचा भोस्ते घाटात होता वावर

Goa Weather Update: गोव्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता, दोन दिवस 'यलो अलर्ट'

Goa Blitz Chess Tournament: ब्लिट्झ फिडे बुद्धिबळ स्पर्धेत नीतिश विजेता; अपराजित राहून सर्वाधिक साडेदहा गुणांची कमाई

SCROLL FOR NEXT