Vasco Market Fire Dainik Gomantak
गोवा

Vasco Market Fire: वास्कोतील अग्नितांडवात 20 कोटींचे नुकसान; 129 पीडित, भरपाईसाठी विक्रेत्यांचा आग्रह

Goa Market Fire Compensation: वास्को येथील भयंकर अग्नितांडवामध्ये सुमारे वीस कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा दावा संडे मार्केट विक्रेते संघटनेचे अध्यक्ष मान्युअल डिसोझा यांनी केला.

गोमंतक ऑनलाईन टीम

वास्को: येथील भयंकर अग्नितांडवामध्ये सुमारे वीस कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाल्याचा दावा संडे मार्केट विक्रेते संघटनेचे अध्यक्ष मान्युअल डिसोझा यांनी केला. आमचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने एक-दोन लाखांच्या भरपाईने काहीच होणार नाही. सरकारने आम्हाला पूर्ण भरपाई द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. येथील विक्रेत्यांचे पुनर्वसन व नुकसान भरपाईसंबंधी चर्चा करण्यासाठी मुरगाव पालिका सभागृहात बैठक झाली.

याप्रसंगी मुख्य सचिव डॉ. व्ही. कंदवेलू, जिल्हाधिकारी एग्ना क्लीट्स, मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर, वास्कोचे आमदार कृष्णा साळकर, उपजिल्हाधिकारी प्रताप गावकर, मामलेदार प्रवीणजय पंडित, मुख्याधिकारी सिध्दीविनायक नाईक, अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर, पोलिस अधिकारी तसेच इतर खात्यांचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आभासी पद्धतीने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हेही सहभागी झाले होते. याप्रसंगी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आगीमुळे झालेले नुकसान, मदत व पुनर्वसनासंबंधी ज्या मागण्या करण्यात आल्या, त्यांची दखल घेण्यात आली.

जिल्हाधिकारी क्लीट्स यांनी सांगितले की, ज्यांचे नुकसान झाले आहे, त्यांची नोंदणी सुरू आहे. छाननीसाठी एक उपसमिती नेमली आहे. त्या समितीमध्ये उपजिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक यांचा समावेश आहे. वास्को येथे काही मिनिटांच्या अंतराने तीन ठिकाणी आग लागल्याने हा घातपाताचा प्रकार आहे, की अन्य काही याविषयी चर्चा सुरू आहे. नवे वाडे येथे एका घराला आग लागल्यानंतर काही मिनिटांनी शहर भागातील वाहनाचे सुटे भाग विक्रेत्यांच्या दुकानांना आग लागली. ही आग विझविल्यावर संडे मार्केटमध्ये मोठी आग लागल्याची बातमी आली. त्यामुळे लोकांमध्ये वेगवेगळी चर्चा सुरू झाले. याप्रकरणी फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून काही नमुने गोळा केले आहेत. त्यांच्या अहवालानंतरच पुढील गोष्टी स्पष्ट होतील.

गुरुवारी सायंकाळी ‘आप’चे नेते वाल्मिकी नायक व इतर काहीजणांनी खासदार सदानंद शेट तानावडे यांच्याकडे काही मागण्या केल्यामुळे वाद निर्माण झाला. ‘पीडितांना मदत करा, फक्त आश्वासन नको, इन्व्हेट नको’ असे नायक म्हणाले. यावेळी त्यांनी अग्निशमन दल व पोलिसांनाही लक्ष्य केले. ‘आप’च्या एका पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने पोलिस अधिकारी व वाल्मिकी नायक यांच्यात वाद सुरू झाला. मात्र, त्या पदाधिकाऱ्याला सोडल्यावर प्रकरण निवळले.

१२९ पीडित; १०५ जणांचे भरपाई दावे

मामलेदार प्रवीणजय पंडित म्हणाले, की आम्ही आपद्ग्रस्तांची यादी तयार केली आहे. त्यासंबंधीची पडताळणी सुरू आहे. १२९ जणांना या आगीची झळ पोहोचली आहे. मात्र, आतापर्यंत १०५ जणांनी दावे केले आहेत. इतरही दावे करतील. त्यासंबंधीचा तलाठी अहवाल तयार करतील.

आग कशी लागली, हे आम्हाला समजले नाही. त्यासंबंधी पोलिस योग्य ती चौकशी करत आहेत. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि नगरविकास मंत्री विश्र्वजीत राणे यांनी दिलेल्या आश्वासनामुळे आम्हाला धीर आला आहे. त्यांनी मार्केटची दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही त्यांचे आभारी आहोत.

- मान्युअल डिसोझा, अध्यक्ष, संडे मार्केट विक्रेते संघटना.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Abhishek Sharma Record: अभिषेक शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर! 35 धावा करताच ईशान किशनला टाकणार मागे; 40 धावांत SKY चा विक्रमही मोडणार!

ST Reservation: एसटी आरक्षणाचा मार्ग पुन्हा खोळंबला! गोवा खंडपीठाचा लोकसंख्येच्या आकडेवारीवर स्थगिती आदेश

Horoscope: 30 ऑक्टोबरचे राशिभविष्य: वृषभ, सिंह, कन्या आणि धनु राशींचे नशीब चमकणार! नोकरीसह व्यवसायातही लाभाचे संकेत

Surya Gochar 2026: सूर्याचे नक्षत्रात परिवर्तन! 'या' 5 राशींच्या नशिबाला मिळणार कलाटणी, 6 नोव्हेंबरपर्यंत होणार बक्कळ धनलाभ

Ind vs Pak: क्रिकेटप्रेमींसाठी मोठी बातमी! भारत-पाकिस्तान पुन्हा आमनेसामने; कधी, कुठे अन् कसा पाहाता येणार हाय-व्होल्टेज सामना?

SCROLL FOR NEXT