FDA Raid X
गोवा

FDA Raid: अस्वच्छ बेसिन, एक्स्पायरी डेट उलटून गेलेले रंग; मुंडवेल-वास्को येथे एफडीएची कारवाई, रेस्टॉरंटला ठोकले टाळे

Vasco FDA Raid: स्वच्छतेसंबंधीचे व अन्न सुरक्षाचे मानंकासंबंधी योग्य अमबजावणी केल्यानंतर तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी दिल्यावर त्याला रेस्टॉरंट उघडता येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

Sameer Panditrao

वास्को: स्वच्छता व अन्न सुरक्षा मानांकाचे उल्लंघन करणाऱ्या येथील एका रेस्टॉरंटला अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. २६) दणका देताना हे रेस्टॉरंट बंद करण्याचा आदेश दिला. स्वच्छतेचे व अन्न सुरक्षा मानांकाचे पूर्णपणे पालन केल्यावरच या रेस्टॉरंटची पुन्हा पाहणी केली जाईल. त्यानंतरच ते सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल, असे महिला अधिकारी संज्योत कुडाळकर यांनी सांगितले.

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने सोमवारी सकाळी अचानकपणे मुंडवेल येथील एका रेस्टॉरंटची तपासणी केली. यावेळी अधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांमुळे मालकाची धावपळ उडाली. पथकाने तेथील जागेची पाहणी केल्यावर त्यांना प्रत्येक ठिकाणी अस्वच्छता दिसली.

शिवाय अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले. याप्रकरणी विचारणा केल्यावर मालक आपण प्रत्येक गोष्टींचे पालन करण्यास तयार असल्याचे वारंवार सांगत होता. परंतु हे अगोदर का केले नाही, असे अधिकाऱ्यांनी विचारल्या यावर तो थातुरमातूर उत्तरे देऊ लागला.

या पथकाला त्या रेस्टॉरंटच्या स्वयंपाक घरात व वस्तूं ठेवण्याच्या खोलीत मोठी अस्वच्छता दिसून आली. फ्रीजमध्ये तयार केलेला अन्नपदार्थ व कच्चे पदार्थ (चिकन वगैरे) एकत्र ठेवल्याचे दिसून आले.

अन्नपदार्थामध्ये वापरण्यात येणारे रंग हे वापरण्याची तारीख उलटून गेल्याचे होतेच, शिवाय ते अन्नपदार्थसाठी वापरण्यासाठी योग्य नव्हते. ज्या बाटल्यांची विल्हेवाट लावावयाची होती, त्यामध्ये अन्नामध्ये वापरात येणारे निरनिराळे रंग भरण्यात आले होते.

सॉस एका फुटलेल्या मोठ्या प्लास्टिक बाटल्यांमध्ये ठेवण्यात आले होते. तेथे बेसिन अस्वच्छ होते. स्वयंपाकघरातच संडास आहे. तेथील स्टोअर रूमही अस्वच्छता होता. काही ठिकाणी पाणी साचले होते.

या सर्व गोष्टींचे नोंद करून त्या मालकाला हे रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश दिले. तेथे स्वच्छतेसंबंधीचे व अन्न सुरक्षाचे मानंकासंबंधी योग्य अमबजावणी केल्यानंतर तसेच अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी दिल्यावर त्याला रेस्टॉरंट उघडता येईल, असे यावेळी सांगण्यात आले.

अचानक तपासणी

अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षिण गोवाचे नियुक्त अधिकारी संज्योत कुडाळकर, वरिष्ठ अन्न सुरक्षा अधिकारी शैलेश शेणवी व अन्न सुरक्षा अधिकारी श्रुती पिळणकर यांचा समावेश असलेल्या पथकाने या रेस्टॉरंटची अचानकपणे तपासणी केली. संज्योत कुडाळकर यांनी प्रत्येकाला अन्न सुरक्षा मानंकाप्रमाणे अन्न मिळाले पाहिजे. रेस्टॉरंट, हॉटेल व इतर ठिकाणी स्वच्छता असली पाहिजे, ग्राहकांना अन्न सुरक्षा मानंकाप्रमाणे अन्न मिळाले पाहिजे. आरोग्यघातक रंगाचा वापर टाळला पाहिजे, असे स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT