Vasco Crime Dainik Gomantak
गोवा

Vasco Crime: सात लाखांचे अमली पदार्थ जप्त; एकाला अटक

पटना एक्सप्रेसने आरोपी वास्कोत दाखल होताच केली कारवाई

दैनिक गोमन्तक

वास्को: वास्को पोलिसांनी सापळा रचून मुळ उत्तर प्रदेशमधील तिलकदार यादव याच्याकडून 7.3 किलो गांजा जप्त केला. त्याची बाजारात किंमत सुमारे 7 लाख रुपये इतकी असल्याची माहिती वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिली.

( Vasco police seized ganja worth seven lakhs from Tilakdar Yadav )

वास्को पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी दिलेल्या माहितीनुसार वास्को रेल्वे स्थानकावर पटना एक्सप्रेसमधून मुळ जौनपुर उत्तर प्रदेश येथील व्यक्ती गांजा घेऊन वास्कोत दाखल होणार असल्याची माहिती सुत्राकडून पोलिसांना मिळाली होती, प्राप्त माहिती नुसार सोमवार (दि. 17) रात्री पटना एक्सप्रेस वास्को रेल्वे स्थानकावर येताच पोलिस निरीक्षक नायक यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलिसांनी आरोपी तीलकदार यादव याला गांजा सहीत ताब्यात घेतले.

यावेळी त्याच्याकडून 7.3 किलो गांजा जप्त केला असून त्याची किंमत बाजारात सुमारे 7 लाख रुपये आहे. वास्को पोलिसांनी अंमली पदार्थ कायद्याअंतर्गत आरोपी तीलकदार यादव याला अटक केली आहे. यापूर्वी गांजा हस्तगत प्रकरणी पोलिसांनी 2006 मध्ये आरोपी तिलकदार यादव याला अटक केली होती. याप्रकरणात अधिक तपास उपनिरीक्षक स्वप्नील नाईक करीत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT