Vasco Police News | PI Kapil Nayak  Dainik Gomantak
गोवा

Vasco Police News: अपघात प्रकरण मिटविण्यासाठी पोलिस निरीक्षकांनी मागितले एक लाख रूपये? वास्कोतील घटना...

सोशल मीडियात पोस्ट झाली व्हायरल झाल्यानंतर पोलिस निरीक्षकांनीच दिले स्पष्टीकरण

Akshay Nirmale

Vasco Police News: वास्को पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक कपिल नायक यांनी अपघाताचे एक प्रकरण मिटवण्यासाठी एक लाख रूपये मागितल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली होती. अखेर या पोस्टवर खुद्द नायक यांनीच स्पष्टीकरण दिले आहे.

कपिल नायक म्हणाले की, ती व्हायरल पोस्ट पाहून मलाही आश्चर्य वाटले. मला याबाबत फोनदेखील आले. वास्कोमध्ये 13 सप्टेंबर रोजी पोलिसांचे सरकारी वाहन एका गाडीचा पाठलाग करत असताना एका अल्पवयीन मुलाच्या गाडीने पोलिसांच्या गस्ती वाहनाला डाव्या बाजूने धडक दिली.

अपघातात जखमी झालेल्याने तसेच गाडीचे नुकसान झाल्याचे पोलिसांनी मला सांगितले. मी हेड कॉन्स्टेबलला पाठवून पंचनामा करण्यास तसेच जी काही कायदेशीर कारवाई आवश्यक आहे ती करावी, असे सांगितले.

आमचा हेड कॉन्स्टेबल घटनास्थळी गेला, त्याने पंचनामा केला. तेव्हा अल्पवयीन मुलगा जो होंडा शाईन गाडी चालवत होता, तो जखमी झाला होता. त्याला दवाखान्यात नेले. त्याच्या पालकांनी येऊन पोलिसांत माहिती दिली की, मुलाने त्यांना अंधारात ठेऊन गाडीची चावी घेऊन गेला.

त्यांनी त्यांच्या मुलाची चूक मान्य केली. तेव्हा त्यांनी गाडीचा जो काही खर्च आहे तो स्वेच्छेने करून देतो, पण मुलाला भविष्यात काही त्रास नको, त्यामुळे कायदेशीर कारवाई काही करू नका, असे ते म्हणाले.

पण त्यानंतर पोलिसांनी पैसे मागितल्याचा मेसेज व्हायरल झाला. पण तुम्ही पालकांनाही नेमके काय झाले ते विचारू शकता. काहीही पडताळणी न करता एखाद्याची बदनामी करणे चूकीचे आहे. मी अधिकारी आहे. आमच्याविषयीच अशी बदनामी केली जात असेल तर ते खूप चुकीचे आहे.

कपिल नायक यांनी यावेळी पत्रकारांसमोर संबंधित अल्पवयीन मुलाच्या पालकांनाही आणले. त्यावेळी पालकांनी चूक कबूल केली. त्यांनी या व्हायरल पोस्टमागे आपला हात नसल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gold Rate: इराण शांतता करार ठरणार 'गेम चेंजर'! डॉलर घसरणार अन् सोन्याचा भाव गगनाला भिडणार; जे.पी. मॉर्गनचा 6000 डॉलर्सचा अंदाज

Aymen Hussein Story: आधी अल-कायदाने वडिलांना मारले, मग इसिसने भावाला पळवले! फिफा वर्ल्ड कपमध्ये इराकच्या अमीन हुसेनचा जगभर डंका

DR. Ram Manohar Lohia Journey: अकबरपूर ते बर्लिन अन् पुढे थेट गोव्याचा स्वातंत्र्यसंग्राम! डॉ. राममनोहर लोहियांच्या जागतिक जडणघडणीचा इतिहास

Calangute Theft: अवघ्या 20 मिनिटांत गाडीचा दरवाजा उघडला अन्...; कळंगुटमध्ये पर्यटकांना लुटणारी आंतरराज्य टोळी गजाआड! 21 महागडे मोबाईल जप्त

Goa Cyber Crime: ...अन् व्हॉट्सॲपवरील 'त्या' मेसेजने केला घात! 'ट्रेडिंग'च्या नावाखाली मडगावच्या महिलेला 33 लाखांचा गंडा; बंगळुरुच्या भामट्याला अटक

SCROLL FOR NEXT