Dabolim Chicalim Dainik Gomantak
गोवा

Dabolim-Chicalim Accident: भरधाव कारने महिलेला चिरडले; अल्पवयीन चालकासह मालक ताब्यात

मृत महिला चिखली येथील असल्याचे स्पष्ट

दैनिक गोमन्तक

वास्को: चिखली येथे जीवघेण्या अपघातास कारणीभुत कार मालक ताहिर खान (वय 27, म्हापसा ) याला वास्को पोलिसांनी ‌अटक केली. ताहिर याने आपली कार एका अल्पवयीन मुलाला दिल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. त्याच्यावर कलम 304 आयपीसी आणि कलम 180 आणि मोटार वाहन कायदा कलम 199-अ (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Vasco police has arrested the car owner in Dabolim Chicalim highway accident)

सविस्तर वृत्त असे की, दोन दिवसांपुर्वी दाबोळी - चिखली राष्ट्रीय महामार्गावर एका अल्पवयीन मुलाने निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चारचाकी चालवत महिलेला धडक दिली होती. यात चिखली येथील दुचाकी महिला रिना गोन्साल्विसचा मृत्यू झाला. तर तिच्या मागे बसलेला पुतण्या गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातास जबाबदार वाहन चालक अल्पवयीन मुलास पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे. दरम्यान अपघाताला कारणीभूत वाहन मालक ताहीर खान याला ( बुधवार ) आज अटक केली आहे. या अपघाताचा पुढील तपास वास्को पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक स्वप्निल नाईक करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT