Crime News Gomantak Digital News
गोवा

Vasco News : चाकूहल्ला करून पळून जाणारा संशयित रेल्‍वेस्‍थानकावर जेरबंद

दुसऱ्या राज्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तपासाची गतीने चक्रे हलवत संशयिताला रेल्वेस्थानकावर जेरबंद केले

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco News : वेर्णा येथे दोघांमध्‍ये झालेल्या भांडणातून एकाने दुसऱ्याला चाकूने भोसकले. त्‍यानंतर तो दुसऱ्या राज्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तपासाची गतीने चक्रे हलवत संशयिताला रेल्वेस्थानकावर जेरबंद केले. पंकज असे त्‍याचे नाव आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, पंकज (21) हा मूळ उत्तरप्रदेश येथील रहिवासी कामाच्या निमित्ताने गोव्यात आला होता. गेल्या काही काळापासून तो वेर्णा कोन्सुवा परिसरात वास्तव्यास आहे. त्याने लवकुश (26) या दुसऱ्या एका तरुणाला चाकूने भोकसले. यात लवकुश गंभीर जखमी झाला आहे. लवकुश हा देखील मूळचा उत्तर प्रदेशातील. त्‍याच्‍यावर चाकू हल्ला केल्यानंतर पंकज रेल्वेने राज्यातून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. सदर घटना दि. 26 मार्च रोजी घडली होती. पोलिस संशयिताच्‍या मागावर होते.

दरम्यान, काल बुधवारी माहिती मिळाली की, संशयित आरोपी पंकज वास्को रेल्वेस्थानकावर दिसला असून तो पळून जाण्याच्या बेतात आहे. त्यानुसार वेर्णा पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक उत्क्रांतराव देसाई यांच्या नेतृत्वाखाली हेड कॉन्स्टेबल सुदेशकुमार देसाई यांच्या पथकाने वास्को रेल्वे स्थानकावर वास्कोचे पोलिस हेड कॉन्स्टेबल सचिन बांदेकर यांच्या मदतीने सापळा रचला आणि संशयिताला ताब्यात घेतले. पुढील तपास वेर्णा पोलिस निरीक्षक डायगो गासियस यांच्या मार्गदर्शनाखाली व मुरगावचे पोलिस उपअधीक्षक सलीम शेख यांच्या देखरेखीखाली सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mitchell Starc Fight: लाईव्ह सामन्यात 'रनिंग लाईन'वरुन राडा! मिचेल स्टार्क मेहदी हसन मिराजशी भिडला; हाय-व्होल्टेज ड्रामा व्हायरल

Goa Olympic Association: 'गोवा ऑलिंपिक'ला 21 वर्षांनंतर लाभणार नवा सचिव, गुरुदत्त भक्ता यांची दोन दशकांची कारकीर्द; महत्त्वाच्या स्पर्धांचे राज्यात आयोजन

Shukra Pushkaransh Yog 2026: शुक्रदेवांची अफाट कृपादृष्टी! 15 ऑगस्टपासून 'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; 'शुक्र पुष्करांश' योग करणार मालामाल

Calangute Dance Bar: कळंगुटमधील 'डान्स बार' बंद करा, गट काँग्रेस समितीची मागणी; पोलिसांना निवेदन सादर

Child Disappearance Goa: राज्यात पाच वर्षांत हरवली 256 मुले, 106 सापडली,150 बेपत्ता

SCROLL FOR NEXT