Morjim Crime : विदेशी महिलेचा विनयभंग; खुनाचा प्रयत्न

मोरजीतील घटना : दोघे जखमी; पीडिता नेदरलॅण्डमधील; रिसॉर्टमधील कामगाराला अटक
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे : मोरजी येथे विदेशी पर्यटक महिलेचा विनयभंग करून तिच्यावर चाकूने हल्ला करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी येथील एका रिसॉर्टमध्ये काम करणारा अभिषेक उमेशचंद्र वर्मा (वय २७ वर्षे) याला अटक केली. यात एक स्थानिकही जखमी झाला. दोन्ही जखमींना उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे.

सविस्तर माहितीनुसार, मोरजी येथील ‘वेल विंग’ या बीच रिसॉर्टमधील एका खोलीत ही विदेशी पर्यटक महिला उतरली होती. आज, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास तिच्या खोलीत एक अनोळखी व्यक्ती घुसली. यावेळी पर्यटक महिलेने मदतीसाठी आरडाओरडा केला.

Goa Crime
Bhola Movie Twitter Reaction : टाळ्या शिट्ट्यांसह थिएटरमध्ये जल्लोष...भोला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला...

महिलेची आरडाओरड ऐकून युरेका डायस हा तिच्या मदतीला धावला असता, ती व्यक्ती पळून गेली. त्यानंतर काही वेळाने पळून गेलेली व्यक्ती परत चाकू घेऊन आली आणि त्याने महिला पर्यटक व तिच्या मदतीसाठी धावून आलेला युरेका डायस या दोघांवरही चाकूने हल्ला करून तेथून पळ काढला. या हल्ल्यात ते दोघेही जखमी झाले. त्यांच्या हातावर चाकूचे वार झाले आहेत.

Goa Crime
Goa Petrol-Diesel Price: गोव्यातील पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे दर

पेडणे पोलिस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केल्यावर पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत, उपनिरीक्षक विवेक हळर्णकर, हरिश वायंगणकर, हवालदार तीर्थराज म्हामल, कॉन्स्टेबल कृष्णा वेळीप, सागर खोर्जुवेकर, प्रेमनाथ सावळ-देसाई, रजत गावडे यांनी पलायन केलेल्या आरोपीचा शोध घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या. संशयित अभिषेक वर्मा हा मूळ डेहराडून, उत्तराखंड येथील आहे. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वाल्सन, पोलिस उपअधीक्षक राजेश कुमार आणि पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पेडणे पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com