Vasco Police  Dainik Gomantak
गोवा

Vasco: वाहतूक नियम मोडताय? कारवाईला तयार राहा; बेशिस्त बाईक रायडर, कार चालक पोलिसांच्या रडारवर

दोन दिवसात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 32 जणांवर कारवाई

Pramod Yadav

Vasco: वास्को येथे दोन झालेल्या दुचाकी अपघातात एका स्वच्छता कामगार महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात अल्पवयीन मुलांचा समावेश होता. याप्रकरणी अल्पवयीने मुलांचे पालक आणि वाहन मालक यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिस देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले असून, वाहतूक नियमांचे (Traffic Violations) उल्लंघन करणाऱ्यांवर त्यांचे बारिक लक्ष आहे.

दोन दिवसांत 32 जणांवर कारवाई

वास्को पोलिसांनी मागील दोन दिवसांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 32 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाईक रायडर आणि कार चालकांवर पोलिसांचे बारिक लक्ष आहे. सिग्नल तोडने, ओव्हर स्पिडिंग याकडे पोलिस विशेष लक्ष देत आहेत. बुधवारी वास्को पोलिसांनी आठ दुचाकी चालकांविरोधात कारवाई केली आहे.

पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांकडे वाहन देऊ नये. तसेच, मुलांकडे कार किंवा बाईक देत असताना त्यांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास बजावणे, परवाना सोबत बाळगणे आणि हेल्मेट घालणे अशी सक्ती करायला हवी. असे आवाहन वास्कोचे पोलिस निरिक्षक कपिल नाईक यांनी केले आहे.

दरम्यान, वास्को येथे झालेल्या दोन विविध अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या दोन्ही अपघातात अल्पवयीन मुलांचा समावेश होता. पोलिसांनी याप्रकरणी वाहन मालकांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलांना गाडी चालविण्यासाठी दिल्याप्रकरणी वाहन मालकांना पाच हजार रूपये तर, अल्पवयीन मुलांना पाच हजार रूपये दंड आकारण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics : ''डबल इंजिन'चे आश्वासन Fail!आता जनताच भाजपला धडा शिकवेल; माणिकराव ठाकरे-अमित पाटकरांचा घणाघात

Goa Crime: वाळपई हादरली! 41 वर्षीय महिलेचे अपहरण करुन जंगलात लैंगिक अत्याचार; अज्ञात नराधमांविरोधात गुन्हा दाखल

IPL 2026 Auction: गोव्याचे क्रिकेटपटू 'आयपीएल' लिलावात पसंतीविना; सुयश प्रभुदेसाई, अभिनव तेजराणा व आणि ललित यादव Unsold

Drishti Marine: समुद्रात बुडणाऱ्या चौघांना जीवरक्षकांकडून जीवदान, दृष्टी मरीनची कामगिरी; दोन बेपत्ता मुलांना काढले शोधून

Goa News Live: लुथरा बंधूंच्या अटकेवर मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचे मौन

SCROLL FOR NEXT