Vasco Pay Parking X
गोवा

Vasco: वास्कोमध्ये Pay Parking व्यवस्था सुरु! कुठे कराल गाडी पार्क? काय आहेत दर? जाणून घ्या..

Vasco Mormugao Pay Parking: बाजारहाटासाठी येणाऱ्यांना मार्केट भागात पार्किंग मिळणे कठिण झाले होते. याप्रकरणी मुरगाव पालिकेने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत असे.

Sameer Panditrao

वास्को: मुरगाव पालिकेने प्रायोगिक तत्त्वावर शहरातील चार ठिकाणी पे पार्किंग सुरू केले आहे. यामुळे वाहनचालकांमध्ये शिस्त येईल, वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईलच शिवाय पालिकेला महसूल मिळेल, असे मुरगावचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी गुरुवारी (ता. १०) सांगितले. वाहनचालकांनी याकामी योग्य सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

वास्को शहर हे नियोजनबध्द शहर आहे. तथापि गेल्या काही वर्षात वाहनांची संख्या वाढली.त्यातच वाहतूक नियम मोडून वाहने मनाला वाटेल तिथे उभी करण्याची वृत्ती काही वाहनचालकांत दिसत होती. त्यामुळे वाहतूक व्यवस्थेत एकप्रकारचा बेशिस्तपणा आला होता.

बाजारहाटासाठी येणाऱ्यांना मार्केट भागात पार्किंग मिळणे कठिण झाले होते. याप्रकरणी मुरगाव पालिकेने योग्य ती पावले उचलावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत असे. याप्रकरणी दखल घेऊन नगराध्यक्ष बोरकर, नगरसेविका श्रध्दा महाले वाहतूक पोलिस निरीक्षक शैलेश नार्वेकर व वाहतूक अधिकारी यांनी गेल्या जानेवारी२०२४ ला ‘पे पार्किंग’संबंधी चाचपाणी करून काही जागांची निवड केली होती.

त्यानंतर मुरगाव पालिका मंडळाच्या बैठकीत या चर्चा होऊन प्रायोगिक तत्त्वावर काही ठिकाणी ‘पे पार्किंग’ करण्याचा ठराव घेतला होता.

त्या ठरावाची कार्यवाही करण्यात आली. सर्व सोपस्कार झाल्याने आता ‘पे पार्किंग’ सेवा सुरू होणार आहे.यासंबंधी नगराध्यक्ष म्हणाले की, काही वाहनधारकांत बेशिस्तपणा आला होता. त्यामुळे चार चाकी वाहनाच्या जागी दुचाकी पार्क केल्या जात होत्या. त्यामुळे इतरांना चारचाकी वाहने उभी करता येत नव्हती. आता पे पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्थेत सुधारणा होईल.

...तर ‘रेंट अ कार’वाल्यांना शुल्क

शहर भागात काही ठिकाणी रेंट-अ- कार वाले आपली वाहने उभी करतात. त्यांच्याकडे वाहतूक पोलिस व वाहतूक अधिकारी वर्गाने लक्ष ठेवावे. रेंट –अ- कारवाल्यांनी पे पार्किंग जागेत वाहने उभी केली,तर त्यांना शुल्क द्यावे लागेल, असे गिरीश बोरकर म्हणाले. विक्रेत्यांनी आपल्या वस्तूं दुकानासमोरच्या पदपथावर ठेवू नयेत. सदर पदपथ पादचाऱ्यांसाठी मोकळा ठेवावा. पदपथावर अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचा इशारा बोरकर यांनी दिला.

इथे असेल पे पार्किंग

येथील एचडीएफसी बँकेसमोरचा अंतर्गत रस्त्याच्या एका बाजूला पे पार्किंग करण्यात येईल. रजनी स्टोअर, पूर्वीचे उपजिल्हाधिकारी कार्यालय, वास्को टपाल कार्यालयसमोरच्या रस्त्यांवर पे पार्किग करण्यात आली आहे. सदर पे पार्किंग सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत असेल. चारचाकीसाठी पहिल्या एक तासाला वीस रुपये तर पुढील प्रत्येकी एक तासासाठी पंधरा रुपये पार्किंग शुल्क असेल. एखाद्याने चारचाकी पे पार्किंग जागेत दुचाकी उभी केल्यास त्या चालकाविरोधात कारवाई करण्यात येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

IND vs AUS 5th T20: मालिकेचा फैसला 'गाबा'वर! सूर्या ब्रिगेड देणार कांगारुंना कडवं आव्हान, कसा आहे ब्रिस्बेनमध्ये टीम इंडियाचा रेकॉर्ड?

Viral Video: याला म्हणतात खरी जिद्द! हात नसतानाही पायाने बाईक चालवून त्याने नियतीलाच आव्हान दिलं, पठ्ठ्याचा जोश पाहून सर्वच हैराण

FDA Goa Raid: एफडीएची मोठी कारवाई! पर्वरीत 700 किलो 'बनावट' पनीर जप्त; अवैध रिपॅकेजिंगचा पर्दाफाश VIDEO

Ironman 70.3 Goa India: गोव्यात रविवारी रंगणार आयर्नमॅन स्पर्धेचा थरार; 31 देशातील 1,300 स्पर्धक घेणार सहभाग

SCROLL FOR NEXT