Panjim News: अरुंद रस्त्यावर पार्किंग कशाला असा नगरसेवक मडकईकर-माईणकरांचा सवाल
Pay Parking Dainik Gomantak

Goa Pay Parking: रस्त्याचे काम व्यवस्थित झालेले नसताना पे-पार्किंग!

Panjim News: अरुंद रस्त्यावर पार्किंग कशाला असा नगरसेवक मडकईकर-माईणकरांचा सवाल
Published on

सांतिनेजमधील नव्याने तयार झालेल्या काँक्रीटीकरणाच्या रस्त्यावर अजूनही साईडपट्टीचे काम व्यवस्थित झालेले नसताना महानगरपालिकेने पे-पार्किंग अधिसूचित केले आहे. या पे-पार्किंगला येथील नगरसेवक उदय मडकईकर, प्रमेय माईणकर यांनी विरोध केला आहे.

महानगरपालिका कार्यक्षेत्रात उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये दोन आणि चार चाकी वाहनांसाठी पे-पार्किंग अधिसूचित केले आहे. त्यात मिरामार चौक येथील सुलभ शौचालयाच्या बाजूच्या रस्त्यांवर, मारुती मंदिराजवळ, काकुलो बेट येथील फार्मसी महाविद्यालयासमोर, सांतिनेज चर्च ते थॉमस गॅरेज आणि सांतिनेज स्मशानभूमी ते मधुबन इमारतीच्या चौकापर्यंत, डॉ. दादा वैद्य मार्ग, डॉ. ब्रागांझा पेरेरा मार्ग (नगरपालिका क्वॉटर्स ते कला अकादमी ) आणि गामा पिंटो मार्ग (नगरपालिका क्वॉटर्स ते हॉटेल पालासियो) अशा या पे-पार्किंग जागांचा समावेश आहे.

अधिसूचनेत पार्किंग शुल्क आकारणी घेणाऱ्या कामगारांस महानगरपालिकेने सुचविलेला गणवेश घालणे आवश्‍यक आहे. त्याशिवाय त्याने ओळखपत्र बाळगणे आणि पार्किंग शुल्क दरपत्रक जवळ ठेवणे आवश्‍यक आहे.

पार्किंग शुल्क पावतीवर पणजी महानगरपालिकेचे नाव असणे गरजेचे आहे. चारचाकी वाहनांसाठी पार्किंग जागेत दोन एमर्जन्सी वाहनांसाठी जागा राखीव ठेवावी. त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तीच्या जागेसाठी जागा राखीव ठेवायला हवी, त्याचबरोबर महानगरपालिकेने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन होणे आवश्‍यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

सांतिनेज परिसरातील नगरसेवक मडकईकर व माईणकर यांनी या पार्किंगला विरोध केला आहे. महानगरपालिकेच्या तीन-चार बैठकांपूर्वी या पार्किंगचा प्रस्ताव आला होता, तेव्हा आपण त्यास विरोध केला असल्याचे मडकईकर म्हणाले.

Panjim News: अरुंद रस्त्यावर पार्किंग कशाला असा नगरसेवक मडकईकर-माईणकरांचा सवाल
Pay Parking: फोंडा शहरात आता ‘पे पार्किंग’!

आगामी बैठकीत विरोध!

सांतिनेजमध्ये वेलनेस मेडिकल ते थॉमस गॅरेजपर्यंत रस्ते अरुंद आहेत. एका बाजूला चारचाकी वाहन उभे राहिले तर दोन्हीबाजूकडून चारचाकी वाहनांना ये-जा करता येत नाही. स्मशानभूमीमध्ये येणाऱ्या नागरिकांना वाहने पे-पार्किंगमध्ये उभे करायचे काय? असा सवाल दोन्ही नगरसेवकांनी केला आहे. महानगरपालिकेच्या बैठकीत बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर झाला आहे, परंतु येत्या बैठकीत या पार्किंगला विरोध करणार असल्याचे मडकईकरांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com