Vasco Jetty  Dainik Gomantak
गोवा

Vasco Jetty : खारीवाडा जेटीवर ट्रॉलर्स विसावले; साफसफाईची लगबग

Vasco Jetty : आता परप्रांतीय कामगार आपापल्या गावी परतणार आहेत. काही कामगारांनी यापूर्वीच आपले घर गाठले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Vasco Jetty :

वास्को, मासेमारीचा हंगाम काल शुक्रवारी ३१ मे रोजी मध्यरात्री संपुष्टात आल्याने वास्को खारीवाडा जेटीवर आज ट्रॉलर्स मोठ्या प्रमाणात उभे करण्यात आलेले आहेत. या ट्रॉलर्सची साफसफाईची कामे सुरू आहेत.

आता परप्रांतीय कामगार आपापल्या गावी परतणार आहेत. काही कामगारांनी यापूर्वीच आपले घर गाठले आहे.

आज १ जूनपासून मासेमारी बंदी राज्यात लागू झाल्याने व मान्सूनही नजीक आल्याने वास्को खारीवाडा जेटीवरील ट्रॉलर्स किनाऱ्यावर आणले असून मच्छीमार जाळी गुंडाळण्याच्या तयारीला लागले आहेत. ३१ जुलैपर्यंत ६१ दिवस ही बंद असणार आहे. खोल समुद्रात मासेमारी बंदी लागू केल्याची अधिसूचना यापूर्वीच जारी करण्यात आली आहे.

पावसाच्या दोन महिन्यांच्या कालावधीत मत्स्यप्रजनन मोठ्या प्रमाणात होते. मत्स्योत्पादनात वाढ होण्यासाठी दरवर्षी मासेमारीवर बंदी घातली जाते. १ जून ते ३१ जुलै हे दोन महिने पावसाळा असतो.

या काळात समुद्र खवळलेला असल्याने खोल समुद्रात जाणेही धोकादायक असते. राज्यात पुढील ६१ दिवस मासेमारी बंदी काटेकोरपणे अंमलात आणण्यासाठी मत्स्योद्योग खात्यातर्फे गस्तीनौकांना पाचारण करून टेहळणी केली जाते.

बंदीमुळे गोव्यातील विविध मासळी मार्केटमध्ये ताजी मासळी मिळत नाही, केरळ, आंध्रप्रदेश या राज्यात मासेमारी बंदी नसते, त्यामुळे तेथील मासळी गोव्यात या काळात आणली जाते.

३५० ट्रॉलर्स राहणार बंद

वास्को खारीवाडा जेटीवरील ३५० हून अधिक ट्रॉलर्स बंद राहणार आहेत. यात लहान व मोठ्या ट्रॉलर्सचा समावेश आहे. हे सर्व ट्रॉलर्स पुढील दोन महिने बंद राहतील व ते किनाऱ्यावर नांगरून ठेवले आहेत. लवकरच ट्रॉलर्सच्या तसेच जाळ्यांच्या डागडुजीच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.पारंपरिक मासेमारी नौका किनाऱ्यावर खेचल्या जात आहेत.

आणि मासेमारीची जाळी मच्छीमारांच्या निवासस्थानी पोहोचविली जात आहे. रांपणकार आणि मागकर यांनीही मासेमारीची कामे बंद केली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ro Ro Ferryboat: रो-रो फेरीबोटींच्या नावावरून गोंधळ! स्थानिक नद्यांची नावे देता आली नाहीत का? अमित पाटकर यांचा सवाल

Panaji: पणजीतील जिवंत माणसाला दाखवले 'मृत'! वीज खात्याचा भोंगळ कारभार; मंत्री ढवळीकर देणार स्पष्टीकरण

Cuncolim Revolt: 442 वर्षांपूर्वी परकीय सत्तेच्‍या विरोधात कुंकळ्‍ळीच्‍या 16 महानायकांनी दिलेला लढा आशिया खंडातील 'पहिला उठाव'

Goa Accident: कानात इअरफोन लावून चालला रुळावरून, रेल्वेने दिली धडक; झारखंडच्या तरुणाचा सांकवाळ येथे मृत्यू

Rashi Bhavishya 15 July 2025: कामातील प्रगती स्पष्ट जाणवेल, प्रेमसंबंधात गोडवा वाढेल; जाणून घ्या तुमच्या राशीचं भविष्य

SCROLL FOR NEXT