Tamborim Verca: तांबोरी-फात्राडे किनाऱ्यावर तणाव! स्‍थानिकांनी राेखली रेतीची वाहतूक; Watch Video

Sand Dunes Destruction Tamborim Verca: लोकांना पाहून रेतीची वाहतूक करण्‍यासाठी कुणीच पुढे आले नाही, असे फुर्तादो यांनी सांगितले.

वार्काजवळील तांबोरी-फात्राडे येथील समुद्रकिनाऱ्यावरील रेती काढून तिची दुसरीकडे वाहतूक करण्‍यासाठी सुरू झालेले प्रयत्‍न शुक्रवारी (ता.२३) सायंकाळी स्‍थानिकांनी हाणून पाडले. वाळूच्‍या टेकड्या कापून ही वाहतूक केली जाते.

यासंदर्भात स्‍थानिक पंचायतीने संपूर्ण दुर्लक्ष केले आहे. या वाळूच्‍या टेकड्या कापणाऱ्यांच्‍या विराेधात आम्‍ही संबंधित अधिकारिणीकडे तक्रार दाखल करू, असे पर्यावरण चळवळीतील कार्यकर्ते सोहेल फुर्तादो यांनी सांगितले.

शनिवारी (ता.२४) सकाळी ही वाहतूक पुन्‍हा सुरू होणार, अशी भीती वाटत असल्‍यामुळे स्‍थानिक घटनास्‍थळी जमले हाेते. मात्र, लोकांना पाहून रेतीची वाहतूक करण्‍यासाठी कुणीच पुढे आले नाही, असे फुर्तादो यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Elevated Road
Galjibaga Beach Erosion Goa
Western Zonal Council Meeting
Goa CRZ 2019 Draft
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com