Republic Day 2026 Wishes: भारतात जन्मलो, हेच माझे भाग्य महान! प्रजासत्ताक दिनी शेअर करा 'हे' शुभेच्छा संदेश

Republic Day Wishes In Marathi: दरवर्षी २६ जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
Republic Day Wishes In Marathi
Republic Day Wishes In MarathiDainik Gomantak
Published on
Updated on

दरवर्षी २६ जानेवारी रोजी देशभरात प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. २६ जानेवारी १९५० रोजी भारताचे संविधान अमलात आले आणि भारत एक संपूर्ण सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष व लोकशाही प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून जगाच्या पटलावर उभा राहिला.

या दिवशी देशाची खरी ओळख असलेली लोकशाही, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये अधिक ठळकपणे समोर येतात. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीच्या अथक परिश्रमांमुळे भारताला जगातील सर्वात मोठे लिखित संविधान लाभले.

दिल्लीतील कर्तव्य पथावर (राजपथ) होणारी भव्य संचलन, तिन्ही दलांची शक्तीप्रदर्शन, विविध राज्यांच्या झांक्या आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे या दिवसाचे मुख्य आकर्षण असते. राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार, शौर्य पुरस्कार प्रदान करून देशसेवेसाठी योगदान देणाऱ्यांचा गौरव केला जातो.

Republic Day Wishes In Marathi
Tecno Spark Go 5G: टेक्नोचा सर्वात स्वस्त 5G स्मार्टफोन लॉन्च; दमदार फीचर्स पाहून तुम्हीही म्हणाल 'वाह'

प्रजासत्ताक दिन हा केवळ उत्सव नसून संविधानाप्रती निष्ठा ठेवण्याचा, कर्तव्यांची जाणीव करून देणारा दिवस आहे. प्रत्येक भारतीयाने संविधानाने दिलेले अधिकार जबाबदारीने वापरून देशाच्या प्रगतीसाठी योगदान देण्याचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा Republic Day Wishes In Marathi

  • संविधानाच्या मूल्यांवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

  • स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या तत्वांची आठवण करून देणारा प्रजासत्ताक दिन मंगलमय ठरो.

  • भारतीय संविधानाचा अभिमान बाळगून देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देऊया.

  • देशासाठी बलिदान दिलेल्या शूरवीरांना वंदन करत प्रजासत्ताक दिन साजरा करूया.

Republic Day Wishes In Marathi
Goa Crime: कार्यालयात घुसले, इंजेक्शन टोचले आणि डोक्यावर वार केला; 2016 मधील ‘सिरिंज हल्ला’ प्रकरणी 4 संशयितांवर आरोप निश्चित
  • लोकशाहीची ताकद जपत जबाबदार नागरिक होण्याचा संकल्प करूया.

  • तिरंग्याच्या साक्षीने एकता, अखंडता आणि देशप्रेम दृढ करूया.

  • हक्कांसोबत कर्तव्यांची जाणीव ठेवणे हीच खरी राष्ट्रसेवा आहे.

  • संविधान आमची ओळख, लोकशाही आमची ताकद – प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

  • विविधतेत एकता जपणाऱ्या भारतमातेचा अभिमान बाळगूया.

  • न्याय, समानता आणि स्वातंत्र्याचा दीप अखंड तेवत राहो.

  • देशाच्या प्रगतीसाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा आहे – शुभेच्छा!

  • 1संविधाननिष्ठ भारत घडवण्यासाठी आज नव्याने संकल्प करूया.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com