Damodar Saptah Dainik Gomantak
गोवा

Damodar Saptah: वास्कोत 1899 साली प्लेगची साथ आली, गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते; हतबल जनतेला तेव्हा 'श्री दामोदर' देवाने तारले

Vasco Saptah: जेव्हा सर्व आशा, वाटा अंधारमय होऊ लागतात तेव्हा आपल्याला तारणारी दैवी शक्ती जागृत होते व तीच यातून आपल्याला तरून नेते. वास्कोवासीयांच्या बाबतीतही काहीसे असेच घडले असावे.

Sameer Panditrao

साल १८९९ प्लेगची साथ पटापट दगावणारी माणसे, जेव्हा सर्व आशा, वाटा अंधारमय होऊ लागतात तेव्हा आपल्याला तारणारी दैवी शक्ती जागृत होते व तीच यातून आपल्याला तरून नेते. वास्कोवासीयांच्या बाबतीतही काहीसे असेच घडले असावे. दैवी शक्तीच्या शोधार्थ वास्कोतील काही ग्रामस्थ श्री देव दामोदर (जांबावली-मडगाव) ला शरण गेले. तेथे गेल्यानंतर कौलाच्या रूपात त्यांना श्रीफळ देण्यात आले व या श्रीफळाची स्थापना करा, असेही सांगण्यात आले.

देवावर श्रद्धा ठेवून हे भक्तगण वाजतगाजत पायी चालत वास्को येथे पोहोचले. मनात भक्ती होती पण आणलेलं श्रीफळ सुस्थितीत ठेवणंही गरजेचं होतं. तर ते कुठे ठेवावं, असाही प्रश्‍न निर्माण झाला व त्याचवेळी या ग्रामस्थांपैकीच एक दानशूर व्यक्ती म्हणजे अनंत जोशी यांनी आपल्या कौलारू घरातील साल पडवी तात्पुरती उपलब्ध करून दिली. या गोष्टीला यावर्षी १२६ वर्षे पूर्ण होत आहेत. अलिकडच्या वर्षांतही अनेक संकटे आली, कोरोना सारखी महामारीही येऊन गेली. अपार श्रद्धा, भक्ती व विश्वास यामुळे वास्कोवासीयांचे जागृत ग्रामदैवत श्री देव दामोदराने तारले.

अविरतपणे १२६ वर्षे बाबू जोशी पुरोहित कुटुंबीयांकडून श्री देव दामोदराची सेवा होत आहे. त्यांची ही चौथी पिढी. सुरवात करायचीच झाली तर श्रीधर जोशी वास्को हार्बर येथे त्यांचे वास्तव्य होते. एका छोट्याशा झोपडीवजा घरात रहायचे. त्यांनीच आपले चुलत बंधू श्री बाबू जोशी यांना हल्याळ कर्नाटक येथून आपल्यासोबत घेऊन आले. हलाखीची परिस्थिती अशातच बाबू जोशी, राजाकाका व द्वारका अशा भावंडाना आपल्यासोबत त्यांचे वडील गेल्यानंतर घेऊन आले व हार्बर येथील आपल्या निवासस्थानी ठेवले.

त्यानंतर ही भावंडे गावात माधुकरी मागून आपला उदरनिर्वाह करायची. मूठभर तांदूळ, कळशीभर पाणी असा निवळ पिऊन ते उदारनिर्वाह करायचे. गोव्यात पोर्तुगीजांचे राज्य होते. त्यांची अमानुष वागणूक, मंदिरांची होणारी मोडतोड या सगळ्यातच वास्को या शहरात सन् १८९९ साली प्लेगची साथ आली. लोक पटापट दगावू लागले. हतबल झालेल्या जनतेला तेव्हा तारले ते श्री दामोदर देवाने. वास्को मूळ जांबावली मडगाव येथून श्रीफळ आणल्यानंतर प्लेगची साथ कमी झाली, असे जुने जाणकार सांगत.

श्री दामोदर हे वास्कोवासीयांचे ग्रामदैवत आहे. जागृत असणारा हा देव दामोदर आपला महिमा वेळोवेळी दाखवित असतो. याचा प्रत्यय अनेकांना आला आहे. तर यांच्याबरोबरीने विनायक उर्फ बाबू जोशी यांनी देव दामोदराची सेवा करण्यास प्रारंभ केला. कधी तेल, वात असली तर असली, नाहीतर केवळ फूल, पाणी अशा पद्धतीने दामबाबाची पूजाअर्चा व्हायची. पण अपार श्रद्धा भक्तीभाव व ब्राह्मणाला असणारा मान, यामुळे सुख व समाधान नांदत होते. कालांतराने बाबू जोशी यांचा विवाह झाला. वंशवेल वाढू लागली. हार्बरची जागा अपुरी पडू लागली तेव्हा बाबू जोशी यांनी वास्कोतील बेलाबायला आपल्या गृहस्थाश्रमाची मेढ रोवली.

भूषण गोविंद जोशी, वास्को

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT