Vasco Dainik Gomantak
गोवा

Vasco: दाबोळी चौकात वाहतूक कोंडी नित्याची! 'नो पार्किंग'चा बोर्ड फक्त नावाला, नियमांचे पालन करणार कोण?

Dabolim Chowk Traffic Issue: रस्त्यालगत काहीजण आपली वाहने पार्क करत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. ‘नो पार्किंग’ फलक असलेल्या जागीच वाहने उभी करण्यात येत असल्याने सदर फलक शोभेचा झाला आहे.

Sameer Amunekar

वास्को: येथील दाबोळी-बोगमाळो चौकात वाहतूक व्यवस्थेत सुधारणांसाठी संबंधितांनी पावले उचलण्याची गरज आहे. येथे उड्डाण पुलाचे काम सुरू असल्यामुळे रस्ते मोकळे हवेत.पण बेशिस्त पार्किंगमुळे कोंडी दिसते.

तथापि तेथील रस्त्यालगत काहीजण आपली वाहने पार्क करत असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत आहे. ‘नो पार्किंग’ फलक असलेल्या जागीच वाहने उभी करण्यात येत असल्याने सदर फलक शोभेचा झाला आहे.

दाबोळी –बोगमाळो चौकात उड्डाण पुलाचे काम सुरू आहे.त्यामुळे तेथे वाहतूक व्यवस्था सुधारण्याची गरज आहे. उड्डाण पुलाच्या कामामुळे दोघांना जीव गमवावा लागल्याने संबंधित कंत्राटदाराविरोधात संतापाची लाट उसळली होती. कोणतीही खबरदारी न घेता तसेच वाहतूक व्यवस्थेसंबंधी कोणेतही फलक न लावता बांधकाम सुरू असल्याने तेथे काही लहानमोठे अपघात झाले होते.

त्यामुळे आवाज उठविण्यात आल्यावर संबंधित कंत्राटदाराने विविध ठिकाणी वाहतूक व्यवस्थेसंबंधी फलक लावून बॅरिकेड्स उभारले आहेत. तथापि आता काही वाहनचालक वाटेल तशी वाहने हाकत असल्याने इतरांना त्रास होत असल्याचे दिसत आहे.

बोगमाळो येथून चौकात आल्यावर वेर्ण्याकडे जाण्यासाठी सुमारे १०० मीटरवर वाहने वळविण्यासाठी रस्ता ठेवण्यात आला आहे. तथापि काहीजण अद्याप चुकीच्या दिशेने वाहने हाकतात. त्यामुळे तेथे अपघात होण्याची मोठी भीती आहे. तेथे काही वेळा उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांसमोरूनच चुकीच्या दिशेने वाहने हाकली जातात.

दाबोळीहून बोगमाळो चौकात वळणाच्या ठिकाणी वाहने उभी करण्यात येत असल्याने अर्धाअधिक रस्ता अडविला जातो. दुसऱ्या बाजूलाही वाहने उभी करण्यात येत असल्याने तेथे वाहनांची कोंडी होते. तेथील दुकानांतून वस्तूं खरेदी करण्यासाठी वाहने रस्त्यावर उभी करण्यात येतात.

यापूर्वी तत्कालीन वाहतूक निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी कारवाई सुरू केल्यावर तेथील रस्ता मोकळा झाला होता. आता संबंधितांविरोधात कारवाई होत नसल्याने, तेथे बरेचजण नियम पालन करीत नसल्याचे दिसते. दाबोळी-बोगमाळो चौकातील रस्ता आता रुंद झाला आहे. त्यामुळे तेथील वाहतूक सुरळीत होण्याची गरज होती.

‘त्या’ वाहनचालकांवर कारवाई व्हावी!

रस्ता रुंद झाल्याने काहीजण आपली वाहने रस्त्यावरच उभी करतात. त्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर वाहने उभी करून इतर वाहनांना अडथळा करणाऱ्या वाहनचालकांविरोधात कारवाई होण्याची गरज आहे. काही वेळा वाहतूक पोलिस संबंधित वाहनांचे फोटो आपल्या मोबाईलवर काढतात.

त्यामुळे त्या वाहनचालकांकडून नंतर दंड वसूल करण्यात येईल. तथापि इतर वाहनचालकांना वचक बसणार नाही. तेथे उभे राहून त्या वाहनचालकांना तेथेच दंड आकारण्यात आला तर इतरांना तेथे वाहने उभी न करण्यासंबंधी संदेश जाईल, यात शंकाच नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: कुडचडे पोलिस स्टेशनजवळ झालेल्या अपघातात स्कूटर चालक जखमी

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

Goa Education: 'UPSC'ची परीक्षा देताय? गोवा विद्यापीठ देणार संपूर्ण प्रशिक्षण; कसं जाणून घ्या एका क्लिकवर!

Kudchire: भलामोठा, 200 वर्षांचा जुनाट वृक्ष धोक्यात; जोरदार पावसामुळे व्हावटी-कुडचिरे येथे कोसळली दरड

SCROLL FOR NEXT