Sancoale Panch Arrest Case
मडगाव: भूतानी प्रकल्पाला विरोध करणारे सांकवाळ पंचायतीचे पंच तुळशीदास नाईक यांना अटक करताना वेर्णा पोलिसांनी त्यांना आधी नोटीस का बजावली नाही याचे स्पष्टीकरण मागणाऱ्या वास्को न्यायालयाने वेर्णा पोलिसांनी या प्रकरणातील पोलिस डायरी आणि अन्य तपशील न्यायालयात हजर करावा, असा आदेश आज दिला. वेर्णा पोलिसांच्यावतीने आज पोलिस निरीक्षक अरुण बाक्रे हे न्यायालयात उपस्थित होते.
वास्कोचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी साहीर इसानी यांच्यासमोर आज पोलिस निरीक्षक बाक्रे हजर होऊन यासंदर्भात आपला अहवाल सादर करण्यासाठी त्यांनी वेळ मागून घेतला. त्यामुळे ही सुनावणी मंगळवारपर्यंत तहकूब करण्यात आली.
सरकारी नोकरांना सरकारी कामकाजापासून रोखणे आणि सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे या दाेन कलमांखाली वेर्णा पोलिसांनी नाईक यांना ४ डिसेंबर रोजी अटक केली होती. मात्र, ही अटक करण्यापूर्वी त्यांना कायद्याने जी नोटीस देणे बंधनकारक होते, ती दिली गेली नव्हती. हे प्रकरण जामिनासाठी न्यायदंडाधिकारी इसानी यांच्यासमोर सुनावणीस आले असता, त्यांनी नाईक यांना जामीन मंजूर करताना पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली मार्गदर्शक तत्त्वे का पाळली नाहीत याचा खुलासा मागितला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.